आदर्श तलाठी पुरस्काराने बोडखे सन्मानित

0
19

गोंदिया,दि.1 : आज १ मे रोजी महाराष्ट्र स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम कारंजा पोलीस कवायत मैदान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराने गोंदिया तालुक्यातील तलाठी आर.एस.बोडखे यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यंवशी,पोलिस अधिक्षक शशीकुमार मीणा,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे,उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव,तहसिलदार संजय पवार,उपविभागीय अधिकारी रामदास राठोड आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.बोडखे यांचे तलाठी संघाच्यावतीने अतुल वर्मा यांच्यासह इतरानी अभिनदंन केले आहे.