गोंदिया- देशामध्ये संपुर्ण स्वच्छता मोहीम हाती घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना स्वच्छतेचा मंत्र दिला.तसेच प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घेऊन ते गाव स्वच्छ सुंदर आणि विकसीत करण्यासाठी खासदार दत्तक ग्राम योजना अमलांत आणली.वास्तविक स्वच्छता अभियानाची मुहूर्तमेळ महाराष्ट्रात गाडगेबाबा यांनी रोवली.त्या आधारावरच महाराष्ट्रात सवार्त आधी ही मोहीम राबविण्यात आली नंतर देशपातळीवर पोचली आता तीला व्यापक स्वरुप पंतप्रधान मोदींनी दिला.याच अनुषगांने राज्यातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि गाव स्वच्छ करण्याची आखणी करण्यात आली.गोंदिया जिल्हा परिषदेतही भाजपची सत्ता आहे.भाजपची सत्ता असलेल्या या जिल्हा परिषदेनेही जिल्हा परिषद सदस्यांनी एक गाव दत्तक घेऊन ते गाव स्वच्छ आणि विकसित करावे अशी मोहीम 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर या काळात राबविण्याचा निणर्य घेतला.परंतु 9 डिसेंबरचा कालावधी लोटल्यानंतरही 51 पैकी अद्यापही 7 सदस्यांनी गावच दत्तक घेतले नाही.यामध्ये विशेष असे की भारतीय जनता पक्षाचे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी या मोहीमेसाठी अाग्रही असतानाच गोंदिया जिल्हा परिषदेेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आणि विद्यमान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असलेले विनोद अग्रवाल यांनी मात्र आजही आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील गाव दत्तक घेतले नसल्याची माहीती जिल्हा परिषदेच्या संपुणर् स्वच्छता अभियानातील अतुल गजभिये यांनी दिलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते.अग्रवाल यांच्यासोबतच भाजपचे सदजस्य विष्णु बिंझाडे, यांचाही समावेश आहे.इतर सदस्यामध्ये मीना राऊत,डाॅ.योगेंद्र भगत,किरण कांबळे,मिना सोयाम,बाळकृष्ण पटले यांचा यात समावेश आहे.या सदस्यांनी अद्यापही गाव दत्तक का घेतले नाही हा चचेर्चा विषय असून यांच्यापयर्ंत मोहीमेचा संदेश पोचला की नाही ते सुध्दा आहे.