देवरी तालुक्यात मृगधारा बरसल्या

0
12

सुरेश भदाडे

देवरी,(१८)- आग ओकणाऱ्या सूर्याच्या उष्णतेमुळे होरपळून निघालेल्या धरणीमायची तृष्णा काही प्रमाणात कमी व्हायला सुरवात झाली. देशाचा पोशिंदा असलेला बळिराजा सुद्धा शेतीच्या हंगामासाठी आसुसलेल्या नजरेने आभाळाकडे बघत होता. त्या जगाच्या पोशिंद्याची आशा काही अंशी काल वरुण राज्याने पूर्ण केली. काल उशिरा रात्रीपासून हलक्या स्वरूपात बरसलेल्या मृगधारांमुळे उष्णतेची कहाली बèयाच अंशी कमी झाली.
यावर्षी उन्हाळ्यात वाढलेल्या पाèयाने चांगलीच धमाल उडवल्याचे नागरिकांनी अनुभवले. उष्णतेच्या पाèयाने यावर्षी ४७ डिग्रीपर्यंत मजल मारल्याने चांगल्याचांगल्यांची भंबेरी उडाली होती. सकाळचे ९ वाजले की अंगाची लाही व्हायला सुरवात होत होती. मोठमोठाले कुलर्स सुद्धा साध्या पंख्याचे काम करीत नव्हते. मानवाप्रमाणे सर्वच जीवसृष्टीला याचा फटका बसला. पाण्याची पातळीसुद्धा यावर्षी चांगलीच खाली गेल्याचे ऐकायला मिळाले. धरणे, तलाव इत्यादी जलस्त्रोतांनी तळ गाठताना पाहण्याचे मानवाच्या नशिबी आले. असे असताना निसर्गाच्या विक्राळरुपाचे दर्शन सुद्धा यावर्षी बऱ्याचे प्रमाणात बघावे लागले. अनेकांचा निसर्गाच्या अवकृपेमुळे आर्थिक नुकसानसुद्धा झाले. अनेक गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवले. त्याचप्रमाणे अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा समाजातील तरुण वर्गाने केल्याचे वृत्त वाचायला मिळाले. प्राणीमात्रांवर भूतदया दाखविण्याऱ्या अनेक युवांनी पक्ष्यांना आसरा देण्याèया गोष्टी प्रामुख्याने केल्या. तृष्णेमुळे पक्ष्यांचा वा प्राण्यांचा जीव जाऊ नये, म्हणून अनेक ठिकाणी पाणवठे तयार केले.
हा सर्व प्रकार अनुभवत असताना सर्वांचा नजरा पावसाळा सुरू झाल्याने आभाळाकडे लागल्या होत्या. कधी एकदाचा पाऊस बरसतो आणि कधी उन्हाच्या कहालीपासून आपली सुटका होते, याची चिंता सतावत होती. त्यातही जगाच्या उदरभरणाची जबाबदारी पेलणाऱ्या आणि नेहमीच सरकार दरबारी उपेक्षित ठरणाऱ्या जुगाऱ्याने पुन्हा एक मोठा डाव खेळण्याची तयारी सुरू केली होती. त्याच्याही नजरा आभाळाकडे खिळल्या होता. हंगामपूर्व मशागतीचे सर्व काम त्याने जवळपास आटोपल्यात जमा आहेत. पावसाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत होते. वेधशाळेकडून येणाऱ्या वृत्तांचे विश्लेषण सुद्धा गावच्या कट्ट्यावर बसून होतानाचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत होते. मॉन्सून कुठपर्यंत पोचला, आपल्या भागात तो कोणत्या दिवशी पोचणार याचा अंदाज वर्तविला जाऊ लागला. पण अंदाज तो अंदाजच. शेवटी काल देवरी तालुक्याला दिलासा मिळाला. अखेर रात्रीपासून हलक्या स्वरूपात बरसलेल्या मृगधारा देवरी तालुक्यात हलका का होईना, गारवा निर्माण करून गेला.