महाराष्ट्र सदनात झाली योगासने

0
26

नवी दिल्ली, २१ : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात
(एनसीआर) आज दुसरा अंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्याची लगबग होती. तशीच ती
महाराष्ट्र सदनातही बघायला मिळाली निमित्त होते, महाराष्ट्र सदनात
मंगळवारी आयोजित दुस-या अंतरराष्ट्रीय योग दिवसाचे.

कोपर्निक्स मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आज सकाळी या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऐस-पैस जागेवर अंथरण्यात आलेली सतरंजी
आणि टापटीप पोशाखांमधे दिसणारे अधिकारी कर्मचारी योगासनाच्या वेशात दिसत
होते. पहिल्या रांगेत निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, गुंतवणूक तथा
राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक
निवासी आयुक्त भारती झाडे, डॉ. किरण कुलकर्णी, संजय आघाव आणि त्यानंतर
अगदी शिस्तित व रांगेत बसलेले महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय
केंद्राचे अधिकारी-कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह यावेळी मोठया संख्येत
सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंचावर गुडगांव
येथील मोक्षायतन इंटरनॅशनल योग आश्रमाच्या डॉ. संयोग लता यांनी
महत्वपूर्ण योगसनांची माहिती दिली व प्रात्याक्षिक करून दाखवली.
योगसानाचे महत्व सांगताना डॉ, संयोग लता म्हणाल्या, दैनंदिन कामातून वेळ
काढून सोप्या आणि नेटक्या पध्दतीने योगासने केल्याने कार्यतत्पर व निरोगी
राहण्यास मदत होते. त्यांनी यावेळी विविध योगासनांचे फायदेही समजाऊन
सांगितले. जवळपास एक तास चाललेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ.
संयोग लता यांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन, भुजंगासन, प्राणायम,
कपालभाती, बध्दकोनासन,अनुलोम-विलोम, वज्रासन, मक्रासन शवासन आदी आसने
केली. ‘सर्वेत्र सुखीन संतू ….’ अर्थात जगात सर्वत्र आरोग्य व शांतता
नांदू दे या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.