‘लुप्त होणाऱ्या भारतीय भाषा वाचवा’

0
8

नवी दिल्ली- गेल्या पन्नास वर्षांत भारतातील २२० भाषा लुप्त झाल्या असून, पुढील पन्नास वर्षांत १५० भाषा संवर्धन न केल्यास नष्ट होतील, अशी भीती खा. पूनम महाजन यांनी लोकसभेत व्यक्त केली. लुप्त होणाऱ्या भाषांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करण्याची विनंती खा. महाजन यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला केंद्र सरकारला केली. त्यावर उत्तर देताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय अनुवाद अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रसिद्ध लेखक एस.एल. भैरप्पा यांना ‘राष्ट्रीय प्राध्यापक’ नेमण्याची सरकारची योजना आहे.
प्रश्नोत्तराच्या तासाला महाजन यांनी भारतीय भाषांची विस्तृत आकडेवारीच सभागृहात सादर केली. तसेच पुरवणी प्रश्न विचारताना खा. पूनम यांनी मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, विविध भारतीय भाषांमधील साहित्य भारताचा समृद्ध वारसा आहे. हा वारसा जागतिक स्तरावर नेण्यासाठी या साहित्याचा अनुवाद होण्याची गरज आहे.