नगर परिषद करणार ११०० वृक्षांची लागवड

0
14

सभापती पंचबुध्दे यांची माहिती
गोंदिया- राज्यात येत्या १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात २ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमात गोंदिया नगर परिषद सहभागी असून शहरात विविध ठिकाणी ११०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या नेतृत्त्वात व मुख्याधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे बांधकाम सभापती बंटी पंचबुध्दे यांनी दिली आहे. यावेळी प्रामुख्याने नगर परिषदेचे सर्व सभापती, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. गोदिया शहराला स्वच्छ सुंदर, हिरवेगार करण्याकरिता वृक्षारोपण करणे व त्याचे संवर्धन करणे आवश्यक असून या कार्यात शहरातील संघटनांनी पुढाकार घेउन सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्ष कशिश जायस्वाल व सभापती बंटी पंचबुध्दे यांनी केले आहे.