अर्जुनी मोर.दि.२७- स्थानिक डॉ.राधाकृष्णन विद्यालयातील २००१ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा जवळील इटियाडोह धरण गोठणगाव येथे उत्साहात पार पडला तब्बल २४ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी दिसताच एकमेकांशी गळाभेट घेत आस्थेने विचारपूस चौकशी केली. स्वतःसह कुटुबियांचा परिचय करून देत संवाद साधला.एकमेकांशी मनसोक्त गप्पागोष्टी करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. नौकरी व्यवसाय कौटुंबिक सुख-दुःख प्रसंग कथन केले संपूर्ण दिवस उत्साही वातावरणात गेलेल्या या वर्ग मित्रांनी पुन्हा पुढल्या रौप्यमहोत्सवी २५ व्या वर्षी यापेक्षाही अधिक जल्लोषात स्नेहमिलन करण्याचा संकल्प करून सर्वांचा निरोप घेतला.
गेल्या दीड वर्षापासून सातत्याने आपल्या वर्ग मित्रांची भेट व्हावी जुने दिवस जुने बालपण पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर दिसावं यासाठी १४ डिसेंबर २०२३ रोजी व्हाट्सअप ग्रुप तयार करून संजय वलथरे, गणेश धामट, गौतम शहारे, गंगोत्री जांभूळकर या वर्ग मित्रांनी विखुरलेल्या मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पाच दहा जवळील मित्र जोडले हळूहळू मित्रांची संख्या वाढत गेली आणि आज तारखेत तब्बल ६३ वर्गमित्र व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले. बेत ठरला भेटायचं दीड वर्षापासून सुरू असलेल्या नियोजनाला तारीख मिळाली २५ डिसेंबर स्थळ ठरल ईटियाडोह धरण गोठणगाव येथे एकत्र जमण्याचा संकल्प केला. यावेळी इतिहासाचे शिक्षक वलथरे तर इंग्रजीचे शिक्षक निमकर यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली. मान्यवर गुरुजनांचा येथोचित मानसन्मान केला त्यांनीही या बॅचमधील असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आपल्या वाणीतून आठवण करून दिली.व पुढील वाटचाली करिता सुभेच्छा दिल्या.उपस्थित झालेल्या सर्व वर्गमित्रांनी आपाल्या भावना व्यक्त केल्या वर्गात घडलेला प्रसंग अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या जीवनात यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपला जुजबी परिचय गुरुजनांना व सहकारी मित्र मैत्रिणींना करुन दिला. हा मैत्रीबंध संमेलन जितका उत्साही व जोश पूर्ण होता तेवढाच भावनिक ठरला पुढील वर्षी परत नव्या दमान भेटण्याचा संकल्प करीत एकमेकांचा निरोप घेतला हा स्नेहमिलन यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गमित्रांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अल्पोहारांनी करण्यात आली.