नाशिक – गारपीटीमुळे द्राक्ष उत्पादक व अन्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातुन त्यांना वाचविण्यासाठी शासन दिर्घकालीन उपाययोजना करील. सोमवारी विधीमंडळात द्राक्षउत्पदकांना अर्थसाह्य तसेच अन्य मदतीचा सर्वंकश निर्णय जाहीर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिंडोरी व चांदवड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यावर केली आहे.
यावेळी वडनेरभैरव (ता. चांदवड) येथे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असल्योन कोणतिही घोषणा करता येत नाही. मात्र शेतीवरील गारपीटीचे संकट मोठे आहे. सरकार तुमच्या पाठीशी असुन शेतकऱ्यांनी धीर सोडु नये. तुमच्याकडे कर्जवसुलीचा तगादा लावला जाणार नाही. तुम्हाला पुढच्या हंगामासाठी पीककर्ज मिळेल याची व्यवस्था करण्यात येईल. तातडीने आर्थिक साह्य देण्यात येईल. त्यासाठी उद्या नागपुर येथे विधीमंडळाच्या अधिवेशनात घोषणा केली जाईल, असेही ते पुढे म्हणाले. गारपीट हा निसर्गनिर्मित आहे. त्यावर उपाय नाही. मात्र त्यातुन होणारे नुकसान कमीत कमी होईल यासाठी दिर्घकालीन उपाययोजना सरकार करण्याचा विचार करील. शेटडनेट हा त्यावर पर्याय असुन दौऱ्यात एका शेतकऱ्याने आपल्या 80 टक्के बागेवर शेडनेट केले होते. तीथे काहीही नुकसान झाले नाही. ज्या वीस टक्के भागात शेडनेट करायचे राहिले तेथे शंभर टक्के नुकसान झाले. त्यामुळे त्या पर्यायाचा स्विकार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपीटीने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष व डाळींब उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. यात असंख्य बागा उध्वस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. यासंदर्भात काल शिवसेनेच्या कोट्यातील सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केल्यावर प्रसंगाची तिव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आज अचानक दुपारी या भागाला भेट दिली. त्यांनी दिंडोरी व चांदवडसह विविध भागाचा दौरा करुन द्राक्षबागांचीही पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या