35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक सहकार पँनलच्या उमेदवारांचे नामांकन दाखल

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक सहकार पँनलच्या उमेदवारांचे नामांकन दाखल

0
596

blank

राकाँ – भाजपा प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

गोंदिया,दि.३०ः जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या २९ जून २०२५ रोजी होणार आहे.त्याकरीता नामांकन भरण्याकरीता आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकत्यांनी मोठ्या संख्येत सहभागी उमेदवारी अर्ज दाखल केले.यावेळी आमदार विनोद अग्रवाल,आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले, माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, भाजपा जिल्हाध्यक्षा सिताताई रहांगडाले, रांकाँ जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांची प्रमुख उपस्थिती होती.गोंदिया जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांचे संयुक्त सहकार पॅनल सामोरे जाणार आहे. तत्पूर्वी न.मा.द महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित सभेला दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना हि निवडणूक जिंकण्याचा संकल्प केला. यावेळी मार्गदर्शन करतांना माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले कि, गोंदिया जिल्हा बँक हि एकमात्र बँक आहे जी मागील १३ वर्षांपासून सतत फायद्यामद्ये राहिली असून राज्यात एक यशस्वी बँक म्हणून नावलौकिकास आली आहे. यावेळी मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोबत आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्याची नावे

blank