
वृत्तसंस्था
जयूपर, दि. १८ – भारतातील सर्वात प्रसिद्ध ‘मछली’ वाघीणीचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. राजस्थानच्या रणथंबोर उद्यानातील ‘मछली’ वाघीण ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती, तिने खाणेपिणेही सोडले होते. अखेर गुरूवारी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
रणथंबोरची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली ‘मछली’ ३० मे रोजी २० वर्षांची झाली होती. सामान्यत: वाघांचे आयुष्य हे १० ते १५ वर्षांचेच असते, मात्र ‘मछली’ २० वर्ष जगली.