साक्षी मलिकनं मिळवून दिलं भारताला पहिलं पदक

0
8

वृत्तसंस्था
रिओ दी जानेरो, दि. 18 – रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवत 125 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याचं तिकीट देणा-या पैलवान साक्षी मलिकचे वडील दिल्लीत बस कंडक्टर आहेत. ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत कोणत्याही महिला पैलवानाने पदक जिंकलेलं नाही. साक्षी मलिक पदक जिंकणारी पहिलीची भारतीय महिला पैलवान ठरली आहे. सोबतच साक्षी मलिकचं पदक भारताचं कुस्तीतलं पाचवं पदक ठरलं आहे. पण अनेकांना माहित नसेल की, साक्षी मलिक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे.
साक्षी मलिक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील सुखबीर मलिक दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये (डीटीसी) कंडक्टरची नोकरी करतात. तर साक्षीची आई सुदेश मलिक या रोहतक येथे अंगणवाडी सुपरवाझर आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल पण कांस्यपदक जिंकणा-या साक्षीला तिच्या आईने पैलवानी करण्यापासून विरोध केला होता. साक्षीने पैलवान होऊ नये अशी तिच्या आईची इच्छा होती.साक्षीच्या कुटुंबात अखाड्याची परंपरा राहिलेली आहे. तिचे आजोबा पैलवान होते आणि ती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पैलवान झाली. आतात कांस्यपदक जिंकून तिने आपला निर्णय सार्थ ठरवला आहे.