26.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home Featured News गर्जा महाराष्ट्र माझा या छायांकीच्या रांगोळीने वेधले सर्वांचे लक्ष

गर्जा महाराष्ट्र माझा या छायांकीच्या रांगोळीने वेधले सर्वांचे लक्ष

0
55

गोंदिया,दि.२२- येथील राजस्थानी भवन इसरका मार्केट येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा रांगोळी स्पर्धेचे आयोजन नितिन व्यास व रोहित जांगडे यांच्या संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.या स्पर्धेत शहरातील असंख्य महिला युवतींनी सहभागी होत रांगाेळीच्या माध्यमातून कला सँस्कृती आणि सामाजिक परिस्थितीचे चित्रण रांगोळीच्या विविध रंगातून केले असून या रांगोळ्या बघण्याकरीता चांगलीच गर्दी दिसून येत आहे.त्यातच शास्त्रीवार्ड निवासी छायांकी कैलास भेलावे हिने महाराष्ट्रातील कला सँस्कृतीचे दर्शन घडविणारे गर्जा महाराष्ट्र माझा ही संकल्पना साकारत छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र रेखाटले असून ते स्पर्धेत लक्षवेधक ठरले आहे.तर महिलांची शक्ती दाखविण्याकरीता मुखोट्याची गरज नाही,तर महिलाच सक्षम असल्याचे चित्रण रांगोळीच्या रंगातून करुन प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.या स्पर्धेचा आजचा(दि.२२)शेवटचा दिवस असून सायकांळी ७ वाजेपासून प्रेक्षकांकरीता रांगोळी स्पर्धा पुन्हा सुरु होणार आहे. blank

blank