25.1 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home Featured News कचारगड आदिवासी बांधवांचे पवित्र श्रध्दास्थान

कचारगड आदिवासी बांधवांचे पवित्र श्रध्दास्थान

0
54

गोंदिया जिल्हा म्हटले की, डोळ्यासमोर नक्षलग्रस्त प्रदेशाचे चित्र उभे राहतेपण जैवविविधतेने संपन्न अशा जंगलांनी वेढलेल्या या भागात एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहेकचारगड गुफामध्ये आदिवासींचे कुलदैवत असल्यामुळे माघ पौर्णिमेला होणाऱ्या यात्रेच्या वेळी येथे आदिवासी बांधवांची गर्दी दिसतेगोदिया-दुर्ग रेल्वे मार्गावर सालेकसावरुन दरेकसा मार्गावर सात किलोमीटरवर असलेल्या धनेगाव येथून कचारगडासाठी चढ़ाई सुरु होतेसालेकसातील गर्द वनराईमुळे एकुणच येथील वातावरण फेब्रुवारीत देखील मस्त थंड असतेयात्रेसाठी पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी सारा परिसर फुलुन गेलेला असतो.

      कचारगड गुफा ही आदिवासींचे श्रध्देचे ठिकाण असल्यामुळे दुरून येथे आदिवासी भाविक मोठ्या संख्येने येतातआशियातील सर्वात मोठी गुफा महाराष्ट्रात येथे आहेगोंदियातील 40 वर्ष जुनी परंपरा असलेल्या कचारगड यात्रेमुळे ही गुफा चर्चेत आली आहेविविध राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात.

       गोंदिया जिल्हयातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुफेत असलेले आदिवासी बांधवांचे पवित्र श्रध्दास्थान आराध्य दैवत म्हणजे पारी कोपार लिंगो” ची मूर्ती आहेमागील 40 वर्षांपासून या ठिकाणी यात्रा भरत असतेकचारगड गुफा प्राचीन काळापासून नैसर्गिक निर्मित आहेया गुफेतुन आदिवासी गोंडीयन धर्माचे संस्थापक पारी कोपार लिंगो यांनी धर्मप्रचार सुरु केला होता, तेव्हापासून या गुफेला आदिवासींचे उगमस्थान संबोधले जातेअतिशय घनदाट जंगलात ही गुफा आहेत्यामुळे या गुफेला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहेया परिसरात विविध गंभीर आजारांवर उपयोगात येणारी वनऔषधी झाडे पहायला मिळतात.

       कचारगड येथे गोंड समुदायाचा या संस्कृतीत सिंहाचा वाटा आहेसुरुवातीच्या काळापासूनच कचारगड हे गोंडी संस्कृतीभाषारूढीपरंपराचे माहेरघर ठरले आहेगोंडी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी कचारगड  प्रसिद्ध आहेगोंड   आदिवासी   भाविक मोठ्या संख्येने कचारगड यात्रेत सहभागी होतात तसेच  या गुफेत एक मोठी निसर्गनिर्मित  विहीरसुद्धा आहे.

       या विहीरीतील पाणी 100 टक्के शुद्ध असल्याचे बोलले जातेया गुफेच्या काही अंतरावरच आणखी एक नैसर्गिक मोठी गुफा आहेया गुफेत प्रवेश करण्यापाठी कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर अंतर पायी डोंगरावर चढावे लागतेप्रत्येकवर्षी या कचारगड यात्रेला विविध राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने हजर राहतातजिल्हयातीलच नाही तर विदर्भातील सर्वात मोठे आदिवासी बांधवांचे पवित्र श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.

       देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील पारी कोपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला येत्या 30 जानेवारीपासून सुरुवात होत आहेही यात्रा पाच दिवस चालणार असून देशातून विविध भागातून लाखो आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होणार आहेतयेणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण यात्रेदरम्यान होणार नाही यासाठी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनामार्फत यंत्रणांच्या  देवस्थान समितीच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेतघनदाट जंगलांनी वेढलेले कचारगड हे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त एक लोकप्रिय ठिकाण आहे.

 – कैलाश गजभिये,उपसंपादक,जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया

blank