श्रीराम सिनेमा गृह लवकरच सुरु होणार!

0
15

तुमसर,दि.16 : गतवैभव असलेले श्रीराम सिनेमा गृहा च्या जागेचा प्रश्न येत्या काही दिवसात निकाली निघणार असुन श्रीराम सिनेमा गृह परत एकदा प्रेक्षकांसाठी सज्ज होणार आहे.यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी पुढाकार घेतला असुन त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश येणार आहे. तुमसर शहर हे एकेकाळी जिल्ह्यात सर्वाधीक तीन सिनेमा गृह असलेले शहर होते. परंतु आज सिनेमा गृह तुमसर शहरात सुरू नसल्याने सिनेमा शौकीनांची पंचाईत होत होती.तर सिनेमा पाहण्याकरीता दुसºया शहरात जावे लागत असल्यामुळे चित्रपट शौकीनांना मोठया प्रमाणात आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्याकरीता शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी पुढाकार घेऊन तुमसरातील श्रीराम सिनेमा गृहाच्या जागेचा तोडगा निकाली काढण्याकरीता राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. संजय राठोड यांच्या सहकार्याने तुमसर येथील श्रीराम सिनेमा गृहाच्या जागेचा वाद निकाली काढण्याकरीता प्रयत्न चालविले.त्या प्रयत्नांना येत्या काही दिवसात यश येणार असुन जवळजवळ पुर्ण प्रक्रिया पार पडली असल्याने तुमसरातील श्रीराम सिनेमा गृह हे पुन्हा सिनेमा पाहण्यासाठी सज्ज होणार आहे. तुमसर शहर व तुमसर, मोहाडी तालुक्यातील नागरिकांना मनोरंजनासाठी भंडारा या ठिकाणी जावे लागते. सदर २००१ पासून बंद असलेली टॉकीज सुरु झाल्यास काही बेरोजगारांना रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. श्रीराम सिनेमागृहाच्या जागेबाबदचा वाद येत्या काही दिवसात पुर्णपणे मिटणार असुन लवकरच तुमसर – मोहाडी तालुक्यातील नागरिकांना तुमसर येथील श्रीराम सिनेमा गृहात सिनेमा बघण्याचा आनंद लुटता येणार असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी सांगितले.