चक्रवर्ती राजाभोज हे अखंड भारताचे प्रेरणास्त्रोत -चेतन भैरम

0
11

भंडारा दि.११: क्षत्रीय राजाभोज पोवार समाज रेंगेपार सातलवाडाच्या वतीने चक्रवर्ती राजाभोज यांच्या जयंती समारोह सोहळा (दि.१०)रोजी संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभा भारतचे जनसंवाद सचिव व मराठी पत्रकार संघ भंडाराचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी चक्रवर्ती राजाभोज हे अखंड भारताचे प्रेरणास्त्रोत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले.
इस.१००० मध्ये परकीय आक्रमणापासून अखंड भारताला संरक्षण देण्यासाठी देशातील सर्व राज्यांना एकत्र करून मोगल व परकीय आक्रमणांपासून देशातील जनतेला दुर ठेवण्याचा प्रयत्न चक्रवर्ती राजाभोज यांनी केला. त्याकाळी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून आपल्या दुरदृष्टीचा त्यांनी परिचय करून दिला होता. चक्रवर्ती राजाभोज यांनी संशोधन करून अनेक साहित्य निर्माण केले. सर्वच जाती-धर्माच्या जनतेला पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत खुले करून समाजातील प्रत्येक घटकासोबत राहुन सर्वांगीन विकास करण्याचा मुलमंत्र दिला होता. सोबतच या काळात अनेक धार्मीक स्थळांची निर्मीती केल्याची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभा भारत जनसंवाद सचिव व मराठी पत्रकार संघ भंडाराचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी दिली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभा भारतचे महासचिव इंजि. मुरलीधर टेंभरे, राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभा भारतचे सहसचिव जगदीश येळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी युवा पोवार संघटना नागपूरचे सचिव टिकेश ठाकरे, अ‍ॅड.ऊपेंद्र कटरे, पं.स.साकोलीच्या सदस्या छाया पटले, डॉ.ओमेंद्र येळे साकोली, पोवार समाज डव्वाचे अध्यक्ष विलास चौव्हाण, सेवानिवृत्त शिक्षक रहांगडाले, सेवानिवृत्त शिक्षक टेंभरे, रेंगेपाचे सरपंचा सावित्रीदेवी बोपचे, वडेगावचे वनरक्षक बी.एस.बोपचे, जांभळीच्या सरपंचा पटले, मालुटोलाचे सरपंच इंदू टेंभरे, गेंदलाल टेंभरे पोलिस पाटील मालुटोला, रविंद्र रहांगडाले पो.पा.वडेगाव, राजकुमार राणे माजी सरपंच खांबा, जगतराम रहांगडाले माजी सरपंच वडेगाव, रविंद्र बिसने साखरवाडा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन रेंगेपारचे पोलिस पाटील केवळराम बोपचे, तंमुस अध्यक्ष संजय पटले, राजाभोज पोवार समाज रेंगेपारचे अध्यक्ष दिलेश्वर बिसेन, उपाध्यक्ष जगदीश बिसेन, कोसाध्यक्ष डॉ. दानवीर पटले, सचिव गौरीशंकर रहांगडाले, कुवरलाल बिसेन माजी पो.पा.रेंगेपार, आदींनी केले.