अवकाळी पावसाने नववर्षाची सुरुवात

0
10

औरंगाबाद : नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतेक जिल्ह्यांसमोर अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलं आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूरसह विदर्भातील बुलडाणा, अमरावती, नागपुरातही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीतही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुळे रब्बी पिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. शिवाय बळीराजा चिंताग्रस्त आहे.

2014 मध्येही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. मात्र आता 2015 च्या सुरुवातीलाही शेती निसर्गाच्या दुष्टचक्रातच अडकलेली पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पावसाने गारवाही वाढला आहे. यामुळे गेल्या काही दिवासांपासून खालावलेला पारा आणखीच खाली गेला आहे.

दरम्यान अवकाळी पावसाचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.