नववर्षाच्या मुहूर्तावर १२ बाळांचा जन्म

0
9

भंडारा : जिल्ह्यातील विविध रुग्णालयात एकुण १२ बाळांनी नववर्षाचा मुहूर्त साधला. गुरुवारला मध्यरात्रीनंतर जन्म घेतलेल्या बाळांमध्ये ७ मुली आणि ५ मुलांचा समावेश आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १ जानेवारी २0१५ रोजी सकाळी ११.२0 वाजता येथील रहिवासी लिपिका विश्‍वास यांनी एका गोडस मुलीला जन्म दिला. याचप्रमाणे लोहारा येथील शिल्पा मेश्राम यांनी सकाळी ११.४0 वाजता गोडस मुलाला जन्म दिया. नववर्षाच्या आगमनावर सुर्य उगवत असताना रुग्णालयातील प्रसूती विभागात आनंदोत्सवाचे वातावरण दिसून येत होते. बाळांचे पालक आनंद साजरा करीत होते. दरम्यान कोथुर्णा येथील सुषमा मेश्राम यांनी दुपारी 1.25 वाजता एका मुलाला जन्म दिला. वरठी येथील रहिवासी स्वाती बांते यांनी दुपारी ३.५५ वाजता गोंडस मुलीला जन्म दिला. महागांव येथील शुद्धमता गोंडाने यांनी सांयकाळी ५.३0 वाजता मुलीला, तर सांयकाळी ७.२0 वाजता जैतपूर येथील दुर्गा पिल्लारे यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
प्रसूती विभागातील कर्मचारी एम. एच. शेन्डे यांनी नववर्षाच्या आगमनावर जन्म झालेल्या बाळांच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यांवर आनंद ओसंडून वाहत होता. प्रसूती विभागात मध्यरात्री दरम्यान सर्व कर्मचारी कर्तव्यावर होते. कर्मचारीदेखील नातेवाईकांच्या आनंदोत्सावत सहभागी झाले होते