राष्ट्रवादी काँग्रेस व भाज अल्पसंख्याक आघाडीतर्फे मुस्लीम बांधवांना ‘ईदच्या शुभेच्छा

0
13

गोंदिया ४ जानेवारी : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘ईद ए मिलाद च्या पावन पर्वावर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीतर्फे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. पाल चौक येथून निघालेल्याया मिरवणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार राजेंद्र जैन ,विशाल अग्रवाल,भाजयुमो अध्यक्ष संजय कुळकणीर्,यांनी झेडी दाखविली यावेळी मुस्लिम समाजातर्फे शहरात काढलेल्या जुलुसातील मुस्लिम बांधवांनाचे चांदणी चौक येथे पुष्पहार देवून स्वागत करण्यात आले. तसेच आईस्क्रीमचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अहमद मनियार, जयंत शुक्ला, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुळकर्णी, जगदीश मिश्रा, अशोक जयqसघानिया, पंकज सोनवाने, शैलेष ढाले, धनंजय रिनाईत, कुशल अग्रवाल, आबीद तिगाला, अयुब सोलंकी, अहमद सोलंकी, अमजद तिगाला, रफीक सोलंकी, जावेद तिगाला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.