पवार काका-पुतण्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवा

0
17

बारामती- बोगस कागदपत्रांच्या आधारे क-हाटी (ता. बारामती) येथील कृषिमूल शिक्षण संस्थेची जमीन विद्या प्रतिष्ठानने बळकावली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी हा उद्योग केला असल्याचा आरोप करून ही जमीन संस्थेला परत मिळावी, या मागणीसाठी क-हाटी येथील ग्रामस्थांनी रविवारी बारामती- मोरगाव महामार्गावर रास्ता रोको केला. तसेच विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व ‘कृषिमूल’चे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बा-हाटे यांनी बारामती पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

2007 मध्ये अजित पवार ही संस्था विद्या प्रतिष्ठानला जोडण्याचा ठराव पास केला. त्याला विरोध करणारे उपाध्यक्ष अरविंद बावळे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव टाकण्यात आला. मात्र कालांतराने प्रत्यक्षात शाळा व शाळेच्या मालकीची ८ एकर जमीन वगळून शासनाने संस्थेला दिलेली ७३ एकर जमीनच विद्या प्रतिष्ठानने हस्तांतरित करून घेतली. संस्था मात्र वाऱ्यावरच राहिली. हा प्रकार उजेडात आल्यानंतर क-हाटीच्या ग्रामस्थांनी त्याविरोधात आंदोलन पुकारले. रविवारी तासभर रास्ता रोको केला. करत जमीन हस्तांतरणाला स्थगिती देण्याची मागणी तहसीलदारांकडे केली.