विद्यार्थी उपाशी,मंत्री अधिकारी तुपाशी,मंत्र्याने केली दिलगिरी व्यक्त

0
19

सामाजिक न्याय विभागाचा पराक्रम
गोंदिया-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नागपूरच्या जात पडताळणी समितीच्यावतीने आज सोमवारी गोंदियात आयोजित प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे नियोजन ढासळल्याने सकाळी नऊवाजेपासून आलेल्या परतालुक्यातील विद्याथ्र्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली.तर त्याच कार्यक्रमात मात्र मंत्र्यासह मंचावरील मान्यवरांसाठी मात्र मिठाईसह काजुकिसमीसची व्यवस्था विभागाच्यावतीने करण्यात आल्याने विद्यार्थी उपाशी आणि मंत्री,अधिकारी तुपाशी अशी म्हणण्याची वेळ आली.दरम्यान सामाजिक न्याय मंत्र्याच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी विद्याथ्र्यांची क्षमा मागत दिलगिरी व्यक्त करीत पुढच्या वेळी जेवणाची सोय करू असे सांगून कार्यक्रमाची वेळ मारून नेली.
येथील पोवार बोर्डिंग मध्ये आयोजित नागपूर विभागीय जातपडताळणी समिती क्रं.१च्यावतीने गोंदिया जिल्ह्यातील १५०० विद्याथ्र्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजी.राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार विजय रहागंडाले,माजी आमदार हरिष मोरे,नगराध्यक्ष कशीश जायस्वाल,भाजपअध्यक्ष विनोद अग्रवाल,उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव,मुख्याधिकारी सुमंत मोरे,जातपडताळणी समितीचे अध्यक्ष संजयसिह गौतम,संशोधन अधिकारी राजेश पांडे,उपायुक्त माधव झोड,सुरेश पेंदाम आदी मंचावर उपस्थित होते.
सकाळी १० वाजेचा वेळ असलेल्या कार्यक्रम तब्बल दोन तास उशिरा १२ वाजता सुरू करण्यात आला.जेव्हा की,विद्यार्थी सकाळी ९ वाजेपासून कार्यक्रमस्थळी हजर असतानाही आलेल्या विद्यार्थी व पालकासांठी कुठलीही नास्त्याची सोय करण्यात आली नव्हती.मंत्रिमहोदय सुधद पावणेदोन तास कार्यक्रमाला उशिरा पोचले.यावेळी मंत्री महोदयानी जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी होणारी पायपीट थांबविण्यासाठी जिल्हास्तरावर तपासणी कक्ष होणार असल्याचे सांगत प्रमाणपत्राचे वाटपही जिल्ह्यास्थळीच करण्याची घोषणा केली.आजच्या कार्यक्रमाचे नियोजन बिघडल्याचे मान्य करीत पुढच्या कार्यक्रमात विद्याथ्र्यांसाठी नक्कीच जेवणाची सोय करण्याची ग्वाही देत झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा करा असे म्हणाले.जातपडताळणीसाठी विभागीय स्तरावर अतिरिक्त जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी प्रमुख असावा ही अट न्यायालयाने घालून दिल्याने आणि इच्छुक अधिकारी यायला तयार नसल्याने थोडा त्रास होत असून शासन उपलब्ध असलेले सचिव पातळीवर अधिकारी यांची नेमणूक घेण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले.प्रास्तविकात माधव झोड यांनी १५०० विद्याथ्र्यांना आज प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगत उपविभागीय अधिकारी यांनी जातपडताळणी व क्रिमिलेयर प्रमाणपत्र देतेवेळे सोबतच प्लेन जातप्रमाणपत्रही संबधिताला देण्याची व्यवस्था केल्यास अनेक निर्माण होणाèया अडचणी उदभवणार नसल्याचे सांगितले.यावेळी संगीता कटरे,मिना कटरे,शाहिले मोरे,सागर येळे,कल्याणी रहागंडाले,मोनिता देशमुख,उत्कर्ष बनसोड व गौरव शहारे या विद्याथ्र्यांना सामाजिक न्याय मंत्र्याच्याहस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.