उद्ध्व ठाकरे यांची फोटोग्राफी अप्रतिम – रावसाहेब दानवे पाटील

0
19

मुंबई :भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्ध्व ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी रावसाहेब दानवे पाटील म्हणाले की, उद्ध्व ठाकरे यांची फोटोग्राफी अप्रतिम आहे. हे खुप सुंदर फोटो आहेत, उद्ध्वजींनी राजकारणात राहूनही कला जोपासली आहे. भविष्यातही त्यांनी काढलेले असेच सुंदर फोटो पहायला मिळावेत.
उद्ध्व ठाकरे यांनी याप्रसंगी मा.रावसाहेब दानवे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, प्रख्यात ​क्रिकेटपटू कपिल देव आणि भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.