स्वच्छ भारत अभियान :सामाजिक संस्थांनी उचलला स्वच्छतेची विडा

0
13

गोंदिया,दि.२६- मानवी जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. qहदू धार्मिक चालीरीतीप्रमाणे मृत्यूनंतर होणारे अंतिम संस्कार हे मोक्षधामावर केले जातात. परंतु, असे असले तरी गोंदिया नगरपालिका प्रशासन या मोक्षधामाच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळते. परिणामी, या मोक्षधामात असलेली अस्वच्छता दूर करण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. यामुळे गेल्या एक वर्षापासून विविध सामाजिक संघटना, बजरंगदल आणि विश्व qहदू परिषदेच्या पुढाकाराने मोक्षधाम स्वच्छता मोहीम सुरू आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समस्त देशवासीयांना स्वच्छतेचे आवाहन करीत स्वच्छ भारत अभियानाची सुरवात केली. यातून देशभरातून लोक प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत असून दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत जनता हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मात्र, गोंदियात परिस्थिती उलटी आहे. येथील मोक्षधाम परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी असताना आणि त्यासाठी आर्थिक तरतूद असताना सुद्धा पालिका प्रशासन मोक्षधामातील स्वच्छतेप्रती कमालीची उदासीन आहे. यामुळे बजरंग दल, विश्वqहदू परिषद आणि अन्य सामाजिक संघटना या मोक्षधाम परिसरात गेल्या वर्षभरापासून स्वच्छता मोहीम राबवीत आहेत. परिणामी, या परिसरातील घाण दूर करून या परिसराचा कायापालट केला आहे.
गेल्या रविवारला २३ जुर्ले रोजी वर्षपुर्तीनिमित्त ५२ वा स्वच्छता आठवड्याला सर्वपक्षिय नेत्यांनी याठिकाणी हजेरी लावली.त्यामध्ये गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल,नगराध्यक्ष अशोक इंगळे,उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर,पोलिस विभागाचे अधिकारी,समितीचे प्रमुख देवेश मिश्रा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.एच.एच.पारधी,ओबीसी संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष कैलास भेलावे,महासचिव शिशिर कटरे,प्रा.संजय रहागंडाले,राजेश राणे,एस.यु.वंजारी,संतोष वैद्य,हर्षल पवार,दुर्गेश रहंगडाले,संजय जैन,माजी नगरसेवक भरत क्षत्रिय,युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे,बटर पटाण,सीए विनोद जैन,राजेश कनोजिया,अभय गौतम,बसंत ठाकुर,शकिल मंसुरी,अदानी फाऊंडेशनचे नितिन शिरोडकर,पोलिस उपअधिक्षक रमेश बरकते,क्रांतीकुमार जायस्वाल,राकेश ठाकुर,दिलीप गोपलानी,गोपाल अग्रवाल,रवी आर्य,इंजी.दिलीप चौरागडे,सुनिल तिवारी,मनिष चौरागडे,प्रोगेसिव्हचे निरज कटकवार,त्र्यंबक जरोदे,जयंत शुक्ला,सविता तुरकर,कशिश जायस्वाल, मुक्तानंद ढोमणे,बंटी मिश्रा,मुकेश उपराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात मोक्षधाम परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी ही नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्राम पंचायतीकडे असताना .या बाबीकडे संबंधित प्रशासन नेहमीच काणाडोळा करीत असतो. त्यामुळे गोंदिया शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मोक्षधाम परिसरात गेल्या वर्षभरापासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील नागरिक, अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी देखील आठवड्यातून दर रविवारी या ठिकाणी एकत्र येऊन दोन तास श्रमदान करीत स्वच्छता अभियान राबवितात. याच मोक्षधामात सर्व समाज मोक्ष धाम सेवा समितीची निर्मिती करण्यात आली आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या ५७ जाती धर्माचे अध्यक्ष आणि सचिव हे या समितीचे सदस्य असून या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात करिता आलेल्या नागरिकांना सोयी सुविधेसह स्वच्छता देखील पुरवतात. गोंदिया मोक्षधाम परिसरात भल्या सकाळी हातात कुदळ फावडे घेऊन आलेले महिला व पुरुष आणि सोबतीला असलेले पोलिस कर्मचारी हे कुठल्याही अंत्य संस्कारांच्या कार्यक्रमाला आले नसून नागरिकांना स्वच्छतेचे धडे द्यायला हजर असतात. सुखी आणि निरामय जीवन जगण्यासाठी काय महत्त्वाचे आहे, हे या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या मोक्षधाम परिसराच्या सौदंर्यीकरणासाठी रोशन जायस्वाल यांच्याकडून पिण्याचे पाण्याची मशीन,अरुण दुबे यांच्याकडून महाराजा गेट,मधु बंसोड याच्यावतीने साऊंड सिस्टीम,अदानी समुहाच्यावतीने उद्यान निर्मितीत सहयोग देण्यात आले आहे.