चिचाळ येथे रंगला ५० मल्लांच्या कुस्तीचा थरार

0
19

पवनी,दि.24 तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसºया दिवशी आयोजित या आखाड्यात जिल्हा व परजिल्ह्यातील ५० मल्लांनी सहभाग नोंदविला. कुस्तीच्या थरारचा आनंद ग्रामीणांनी मनमुराद लुटला. यात केशव लेदे हे विजेता ठरले तर नामदेव शास्त्रकार उपविजेता ठरले.विशेष म्हणजे चिचाळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या केशव लेदे यांनीही सहभाग घेतला.शिक्षक लेदे यांनी अनेकदा आखाडे गाजविले हे अनेकांनी माहित नव्हते. बघता बघता शिक्षक लेदे कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहचले आणि शेवटचा आखाडा सुरू झाला. अंतिम सामन्यात लेदे यांच्याची झुंज नागपूर येथील नामदेव शास्त्रकार यांच्याशी होती. यात लेदे यांनी शास्त्रकार यांच्यावर मात करून कुस्तीचा आखाडा जिंकला.
अ‍ॅड. देवीदास वैरागडे यांनी ही आखाड्याची परंपरा कायम राखली आहे. पवनी तालुक्यातील चिचाळ हे गाव स्वातंत्र्य सैनिकाचे गाव आहे. या गावात जैराम दिघोरे, देवराव वाघधरे, ढेकल डहारे, दिवारु वाघधरे आदी पहेलवानांनी १९७६ पासून गावात आखाडा भरण्याची परंपरा सुरू केली होती. ती आजतागायत जोपासली जात आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षाला अहिल्यादेवी होळकर बाजार चौक येथे आखाड्याचे आयोजन अ‍ॅड. देवीदास वैरागडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले. अतिथी म्हणून जयराम दिघोरे, दिवारू वाघधरे, देवराव वाघधरे, शंकर मांडवकार, रामकृष्ण वैरागडे, बिरशिराम भुरे, तुकेश वैरागडे, श्रीकृष्ण काटेखाये, वासुदेव लेंडे, यशवंत लोहकर, कलीम शेख, चिंकू सलूजा, सरपंच उषा काटेखाये, पं.स. सदस्य मंगला रामटेके आदी उपस्थित होते. या आखाड्यात पंचक्रोशीतील व परजिल्ह्यातील मल्लांनी सहभाग घेतला होता. विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम अ‍ॅड. देवीदास वैरागडे व परसराम दिघोरे यांचेकडून देऊन गौरविण्यात आले. मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मागील ४० वर्षांपासून ही परंपरा कायम राखल्याने अनेकांना हे सांस्कृतिक पर्वणीच असल्याचे वाटते. प्रथम, द्वितीय मल्लांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देण्यात आले. जिल्ह्यातील मल्लप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. पंच म्हणून ईश्वर वैद्य, देवराव वाघधरे,बिरशीराम भुरे, जयराम दिघोरे यांनी केले.