चार दिवस आयोजन : विविध कार्यक्रम
घुग्घुस : अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने घुग्घुस येथे बॅरि.. राजाभाऊ खोब्रागडे परिसरात चार दिवसीय १२ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ४ दिवसीय साहित्य संमेलनात विविध विषयांवर विचारवंत आपले विचार व्यक्त करणार आहेत. याबरोबर विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
१६ जानेवारी रोजी सांयंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब यांचे अस्थिकलश, ग्रंथ व संविधान प्रबोधन रॅली, प्रज्ञाबुध्द विहार घुग्घुस कॉलरी येथून निघणार आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता संमेलनाचे उद््घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नरेन गेडाम राहणार असुन संदेश वाचन देवानंद सुटे करणार आहेत.
यावेळी ज्येष्ठ साहित्यीक अशोक बुरबुरे, जिग्मे त्सुल्ट्रोम (तिबेट), ई. झेड. खोब्रागडे, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, मोहनदास नैमिशराय, प्रा. अविनाश डोळस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दूपारी २ वाजता सांसदीय लोकशाही आणि आंबेडकरवाद या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ४ वाजता माझे लेखन, माझी चळवळ या विषयावर अनुभव कथन, सायंकाळी ७ वाजता अजय चेतन प्रस्तुत वादळवारा गीतांचा कार्यक्रम व रात्री ८ वाजता उशाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन होणार आहे.
१८ जानेवारीला सकाळी ८ वाजता मनोहरदीप रूसवा यांचा भीम गीतांचा कार्यक्रम असून सकाळी १0 वाजता लोकशाही हा केवळ परस्परांचे अनुभव परस्परांना देवुन घेऊन संघबध्द राहण्याची सहजीवनाची एक पध्दती आहे या विषयावर चर्चासत्र होणार आहे. तसेच १९ जानेवारीलाही विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे आयोजकांनी कळविले आहे.
नागरिकांनी आंबेडकरी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन संमेलन समिती घुग्घुसच्यावतीने करण्यात आले आहे.
घुग्घुस येथे उद्यापासून आंबेडकरी साहित्य संमेलन
वाढदिवसाच्या शुभेच्छा