बछवराज चित्ते;आदिवासी ङ्मुवकांना दिशा दाखविणारा पोेलिस अधिकारी

0
15

गोंदिङ्मा-अगदी सुरवातीपासूनच अर्जुनी मोरगाव, देवरी आणि सालेकसा या गोंदिया जिल्ह्यातील तीनही तालुक्यांची ओळख नक्षलप्रभावीत तालुके अशीच आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही तालुके विकासाच्या दृष्टीने तशी उदासीन होती. परिणामी, शासकीय सोईसुविधांच्या अभावामुळे अनेक आदिवासी युवक नक्षल चळवळीकडे आकृष्ट झाली होती. परंतु, हळूहळू परिस्थिती बदलत गेली.
प्रशासन आणि पोलिस यांची आदिवासी जनतेशी वैचारिक गट्टी घट्ट होत गेली. काही पोलिस अधिकाèयांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या पैशातून आदिवासी भागातील युवकांना प्रशिक्षणासोबतच क्रीडाक्षेत्रात पुढे येता यावे म्हणून मोलाची कामगिरी केली. वाचनाची सवय लागावी म्हणून वाचनालये उघडली. वरिष्ठ पोलिस अधिकाèयांचे सहकार्य आणि गावातीलच युवकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांतर्गत येणाèया भरनोली येथील पोलिस उपनिरीक्षक बछवराज चित्ते यांनी गावातील नागरिकांच्या सहकार्याने एका पडक्या इमारतीमध्ये लोकवर्गणी गोळा करून वाचनालय सुरू केले. यामुळे येथील आदिवासी युवक-युवतींना वाचनाची सवय लावण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविला गेला.
या उपक्रमाची नागरिकांनी चांगली स्तुती करीत प्रतिसाद दिला. वास्तविक शासनाची गाव तिथे वाचनालयाची योजना असतानाही त्याठिकाणी वाचनालय सुरू होऊ शकले नव्हते. क्रीडा विभागाच्या वतीने पुरविण्यात आलेले साहित्य सुद्धा एका खोलीमध्ये पडून होते. अळगडीतील साहित्याचा लाभ या भागातील युवकांना व्हावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून क्रीडा विभागाने पाठविलेले साहित्य मिळावे, यासाठी पाठपुरावा करण्यास सुरवात केली. एक पडकी इमारत नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्या इमारतीची डागडुजी करून वाचनालय आणि व्यायाम शाळा कार्यान्वित केली.
विशेष म्हणजे पोलिस उपनिरीक्षकांच्या या भूमिकेमुळेच या गावातील युवकांनाच नव्हे तर नागरिकांना सुद्धा वृत्तपत्र कसे असते, ते बघावयास मिळाले. पोलिस अधिकारी, कर्मचारी, गावातील नागरिकांच्या लोकवर्गणीतून गोळा झालेल्या २ लाखातून या इमारतीमध्ये पुस्तके व इतर साहित्य खरेदी करण्यात आले. अशा या सुसज्ज वाचनालय व ग्रंथालयाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने आणि अर्जुनी मोरगावचे सभापती तानेश ताराम यांच्या हस्ते काही दिवसापूर्वीच करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या पांठिब्यामुळेच आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील भरनोली येथील युवकांना एक न्याय देऊ शकलो, अशी प्रांजळ कबुली पोलिस उपनिरीक्षक बछवराज चित्ते यांनी दिली.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भरनोली येथे पोलिसांची आऊटपोस्ट असून गटग्रामपंचायत असलेल्या या गावाला नागनडोह, राजोली, तिरपुरी, बोरटोला, शिवरामटोला, सायगाव, तूकूम,नविनटोला आदी गावांचा समावेश आहे. भरनोली येथील पोलिस उपनिरीक्षकाच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ग्रंथालयाचाच नव्हे तर व्यायामशाळेचा लाभ या परिसरातील युवकांना मिळू लागला आहे. याच ग्रंथालयाच्या माध्यमातून तलाठी, ग्रामसेवक यासारख्या परीक्षांची तयारी सुद्धा युवकांकडून करवून घेतली. परिणामी, दोन ते तीन आदिवासी युवकांचे नशीब पार बदलून गेले.
या उपक्रमामुळे त्यांना शासकीय नोकरी लाभली. भरनोली येथील ग्रंथालयाला मिळालेला प्रतिसाद बघता आता नक्षलग्रस्त भागातील प्रत्येक पोलिस आऊटपोस्ट असलेल्या ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय जिल्हा ग्रंथालय संघाने घेतल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक बछवराज चित्ते यांनी दिली.
विशेष म्हणजे भरनोलीच्या ग्रंथालयासाठी तर ५ लाखाचा निधी सुद्धा मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात आता नक्षलग्रस्त भागातील ९ आऊटपोस्टच्या ठिकाणी व्यायामशाळा बांधकामाला मंजुरी देण्यात आली.