व्यापार्याची क्षमतेवरच व्यवहाराची दिशा-खा.प्रफुल पटेल

0
21

गोंदिया-गोंदिया भंडारा जिल्ह्यात गेल्या ४५ वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासामुळे विदर्भात आपल्या शाखा उघडून प्रत्येक नागरिकासह ग्राहकाला चांगली सेवा देणारी बँक म्हणून भंडारा अर्बन बँक समोर येऊ लागली आहे.परंतु, बँकेच्या विकासवाढीला हातभार अजून लावायाचे असल्यास जोपर्यंत या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वागीण विकास होणार नाही.तसेच व्यापार करण्याची क्षमता जोपर्यंत वाढणार नाही, तोपयर्त व्यापारी व ग्राहकांची व्यवहारक्षमता वाढणार नाही. त्यामुळे व्यापाराची क्षमता वाढविण्यासाठी आपणा सर्वांना जोर द्यावा लागणार असून त्यावरच व्यवहाराची दिशा ठरणार असल्याचे प्रतिपादन खासदार खा.प्रफुल पटेल यांनी काढले.
ते भंडारा अर्बन को ऑफ बँकेच्या गोंदिया शाखेच्या वतीने आयजित प्रीतम लॉन येथील ग्राहक मेळाव्यात उदघाटक म्हणून शुक्रवारी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष अ‍ॅॅड.जयत वैरागडे होते. अतिथी म्हणून आमदार राजेंद्र जैन,बँकेचे उपाध्यक्ष महेश जैन,संचालक धनंजय दलाल,नाना पंचबुध्दे,गोपीचंद थवानी,अजय वडेरा,चुन्नीलाल बेंदरे,गोविंद शेंडे,आंनदराव कृपाण,हुकूमचंद अग्रवाल,विनोद हरिणखेडे,देवेंद्रनाथ चौबे,अशोक जैन,पृथ्वीपालसिंह गुलाटी,बँकेचे व्यवस्थापक मदान यांच्यासह संचालक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पटेल म्हणाले की, बँक विश्वासाचे प्रतीक आहे.शासन व आरबीआयच्या मार्गदर्शनात चालणारी ही बँक सर्वसामान्यांची असून राष्ट्रीयकृत बँक गावापर्यंत पोचली असली तरी आपल्या बँकेमध्ये संपर्क यंत्रणा चांगली असल्याने आपण आजही या स्पर्धेत टिकून आहोत. ४५० कोटीची उलाढाल असलेली बँक १००० कोटीची करावयाची असून यासाठी आपल्या जिल्ह्यात रोजगार,उद्योग,कर्मचारी यांची संख्या वाढली पाहिजे, त्याशिवाय शक्य नाही.
काही लोक अच्छे दिन चे गाजर दाखवीत आहेत. परंतु, ज्यांना शेतकऱ्यांवर या दोन्ही जिल्ह्याची व्यापारपेठ अवलबूंन आहे,त्या व्यापारी वर्गानेच सांगावे शेतकरी खुश आहेत की काय असे सांगत गेल्या सात महिन्यात काही प्रगती झाली नसून गेल्या पाच वर्षात करण्यात आलेल्या धोरणाची ही फलश्रुती असल्याचे म्हणाले.
यावेळी आमदार जैन यांनीही विचार व्यक्त करीत शेतकऱ्यांना १२० कोटीचे कर्ज वाटप केल्याचे सांगितले.धनजंय दलाल यांनी बँक कर्मचारी यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आल्याची महिती दिली. तर बँकेचे अध्यक्ष वैरागडे यांनी बँक कर्मचारी व ग्राहकांच्या विश्वासामुळेच आज आम्ही या स्पर्धेत टिकून आहोत हे सांगतच पाच वर्षात १२ हजार सभासद संख्येत वाढ झाली ती सुध्दा कुठलेही पक्षभेद न करता. बँकेचा विस्तार विदर्भाबाहेर करावयाचा असून ग्राहकांनी विश्वास कायम ठेवावा असे म्हणाले. प्रास्तविकात संचालक गोपीचंद थवानी यांनी गोंदिया शाखेने नफा मिळविण्यात आघाडी घेतल्याचे सांगितले.