‘बादशाह खान’ला लागली होती ‘बेनझिर’च्या मृत्यूची कुणकुण?, मध्यरात्री केले होते ‘हे’ ट्वीट

0
38

‘खुदा गवाह’ या चित्रपटात बादशाह खानची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांना कदाचित त्यांच्या ‘बेनझिर’ अर्थातच श्रीदेवीच्या मृत्यूची कुणकुण लागली होती. त्यांनी श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त येण्याच्या काही मिनिटांपूर्वी एक ट्वीट केले होते. त्यात ते म्हणाले, ‘न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है!!.’ अमिताभ बच्चन खूप बैचेन झाले होते, याचे कारण त्यांना कळत नव्हते. कदाचित त्यांना श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त तिच्या कुटुंबातून मिळाले असावे. ‘आखिरी रास्ता’ आणि ‘खुदा गवाह’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी एकत्र काम केले होते. अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोच्या सेटवरही श्रीदेवीने हजेरी लावली होती.

 श्रीदेवीचे शनिवारी (24 फेब्रुवारी) रात्री 11:30 च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झआले. श्रीदेवीच्या शेवटच्या काळात तिचे पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी तिच्या सोबत होती. भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी कुटुंबासोबत दुबईला गेली होती. पण तिची थोरली मुलगी जान्हवी कपूर चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने लग्नात सहभागी होऊ शकली नव्हती.

श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 50 वर्षे तिने सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले होते. वयाच्या 54 व्या वर्षी बॉलिवूडच्या हवाहवाईने जगातून कायमची एक्झिट घेतली. सदमा, नगीना, कर्मा, चांदनी, लम्हें, चालबाज, इंग्लिश-विंग्लश आणि मॉम या हिट चित्रपटांमध्ये श्रीदेवीने काम केले. 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने श्रीदेवीला सन्मानित करण्यात आले होते.

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. दुबईमध्ये आपला भाचा मोहित मारवाहच्या लग्नात श्रीदेवी गेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीटवरुन श्रीदेवीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय. त्यांनी आपल्या करियरमध्ये अनेक प्रसिध्द भूमिका साकारल्या.

अनेक सुपहिट फिल्म
श्रीदेवीने ‘सोलहवां सावन’ (1978), ‘हिम्मतवाला’ (1983), ‘मवाली’ (1983), ‘तोहफा’ (1984), ‘नगीना’ (1986), ‘घर संसार’ (1986), ‘आखिरी रास्ता’ (1986), ‘कर्मा’ (1986), ‘मि. इंडिया’ (1987), लाडलासोबतच अनेक बॉलिवूड चित्रपट केले. श्रीदेवीने फिल्म प्रोड्यूसर बोनी कपूर यांच्यासोबत 1996 मध्ये लग्न केले होते. ‘मि. इंडिया’ चित्रपटापासून त्यांच्या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. श्रीदेवीने बोनी कपूरसोबत लग्न करुन आपले फॅन्स आणि इंडस्ट्रीच्या लोकांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

बॉलिवूडमध्ये गाजले हे गाणी

ऐ जिंदगी, गले लगा ले (सदमा)
ना जाने कहा से आई है (चालबाज)
नैनो मे सपना (हिम्मतवाला)
मेरे हाथों मे (चांदनी)
प्यार प्यार करते करते (जुदाई)
नवराई माझी (इंग्लिश विंग्लिश)
गोरी तेरे अंग अंग मे (तोहफा)
मै तेरी दुश्मन (नगिना)
नैनो मे सपना (हिम्मतवाला)
मेरे हाथों मे (चांदनी)
रंग भरे बादल से… चांदनी (चांदनी)
मोरनी बागा मां (लम्हे)
मेरी बिंदिया (लम्हे)
हवाहवाई (मि. इंडिया)
मै रुप की रानी तू चोरों का राजा (रुप की रानी चोरों का राजा)
तू ना जा मेरे बादशाह (खुदा गवाह)
काटे नही कटते (मि. इंडिया)
ना जाने कहा से आई है (चालबाज)
नैनो मे सपना (हिम्मतवाला)
मेरे हाथों मे (चांदनी)
रंग भरे बादल से… चांदनी (चांदनी)
मोरनी बागा मां (लम्हे)
मेरी बिंदिया (लम्हे)
मै रुप की रानी तू चोरों का राजा (रुप की रानी चोरों का राजा)
तू ना जा मेरे बादशाह (खुदा गवाह)
प्यार प्यार करते करते (जुदाई)
नवराई माझी (इंग्लिश विंग्लिश)