मिहानला गती येणार-मुख्यमंत्री फडणवीस

0
23

नागपूर-विदर्भातील उद्योगधंद्याला वेगाने चालना देण्यासाठी मिहान प्रकल्प पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी आज एका दिवसात अनेक महत्त्वाचे उपाय केले गेले. महागडी वीज हा अवघ्या महाराष्ट्राचा जुना प्रश्न आहे. त्याचा फटका येथील उद्योगधंद्यांना बसतो. मिहान प्रकल्पात तर ही समस्या प्रकर्षाने जाणवते.मंगळवारी मिहानच्या आढावा बैठकीत या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा तोडगा काढला की, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी आणि एमएडीसी यांनी संयुक्त करार करून उद्योजकांना ४ ते ४.३० रुपये प्रति युनिट अशी सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करावी.
mihan-2
मिहानसाठी जमीन ताब्यात घेताना झुडुपी जंगलांच्या जागेचा प्रश्न आहे. त्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला आणि हा प्रश्नही निकाली काढला. पुनर्वसन प्रक्रियेतून कोणताही मिहान प्रकल्पग्रस्त राहणार नाही याची खबरदारी घेण्याचा स्पष्ट आदेश मी उपस्थित अधिकार्‍यांना दिला. पुनर्वसनासाठी ज्यांना भूखंड हवे आहेत त्यांची १०० चौरस मीटरचा भूखंड आणि त्यावर २५० चौरस फूट बांधकामासाठी २.५ लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळण्याची मागणी आहे. त्याचा प्रस्ताव एमएडीसीमार्फत शासनाला सादर करण्याची सूचना मी दिली. मिहान प्रकल्पामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी गुंतवणुकीच्या बाबतीत उद्योजकांशी थेट चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा आदेश दिला. यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे, मिहान प्रकल्पांतर्गत येणार्‍या गावातील प्रकाश भोयर आणि विजय राऊत, उद्योजकांच्या संघटनांचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते