24.4 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home Featured News पवारी साहित्य कला संस्कृती मंडळचा स्थापना दिवस उत्साहात

पवारी साहित्य कला संस्कृती मंडळचा स्थापना दिवस उत्साहात

0
41

नागपूर,दि.14ः-पवारी साहित्य कला संस्कृती मंडळाचा प्रथम स्थापना दिवस येथील पवार विद्यार्थी भवनात पार पडला.पवारी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक समाजसेवकांनी वैयक्तिक स्तरावर प्रयत्न केले. पण या भाषेच्या उत्थानासाठी एक नोंदणीकृत संस्था असेल तर या विकास कार्याला अधिक गती प्राप्त होईल या उद्देशाने एकत्रित येऊन पवारी साहित्य कला संस्कृती मंडळांची स्थापना करण्यात आली असून सर्व समाजबांधवानी भाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.तसेच पुढील 2 रे पवारी साहित्य कला संस्कृती मंडळाचे साहित्य संमेलन कारंजा घाडगे येथे आयोजित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवारी साहित्य कला संस्कृति मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे होते.तर उद्घाटक म्हणून  पवार क्षत्रीय महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. टी. डी. बिसेन उपस्थित होते.यावेळी मंचावर  क्षत्रिय पवार महासभेचे  राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे,पवारी पवार साहित्य कला संस्कृति मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लखनसिंह कटरे, पवार महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोतीलाल चौधरी,रमेशजी टेंभरे (कोषाध्यक्ष क्षत्रिय पवार महासभा), प्रा. डॉ. तीर्थनंदनजी बन्नगरे आर्वी,जयपालसिंह पटले,प्रा. भगवान बन्नगरे (अध्यक्ष कारंजा-पवार समाज), बंडुभाऊ पराडकर blank(कोषाध्यक्ष) कारंजा,मधूकर चोपडे, तसेच पवार साहित्य मंडळाचे सचिव देवेंद्र चौधरी,सहसचिव डॉ. शेखराम येळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आयोजित कविसम्म्मेनात कवी डॉ. श्री शेखराम येळेकर,देवेंद्र चौधरी, कवियत्री सौ. विद्याबाई बिसेन,चिरंजीव बिसेन,यादोराव चौधरी,महेंद्रकुमार पटले,देवेंद्र उर्फ बंटी रहांगडाले,आशिष अंबुले,पालीकचंद बिसने,हिरदीलाल ठाकरे,रामचरण पटले,कल्याणी पटले,फिरोज पटले,सौ. दीपाली बिसेन,सौ. उषाताई पटले,हरिश्चंद्र देशमुख,कल्याणी पटले,तुफानसिंह पारधी,उमाजी बिसेन आदि कविता सादर केल्या. संचालन कवी व पवारी साहित्य कला संस्कृति मंडल चे सदस्य रवींद्रकुमार टेंभरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. श्री शेखराम येळेकर यानी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पवार समाज संघटन नागपूरने विशेष सहकार्य केले.

“पवार समाज संगठन, नागपूर ” च्या नवीन कार्यकारीणीचे गठण

यावेळी पवार समाज संगठन नागपूरच्यावतीने वर्ष २०१८-२०१९ चे वार्षिक अहवाल सादर करुन २०१९-२०२२ या वर्षाकरीता नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.निवडणुक अधिकारी म्हणून हितेंद्र चव्हाण यांनी काम पाहिले.याप्रसंगी निवृत अध्यक्ष रमेश टेंभरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यकारीणीत अध्यक्ष पदी पृथ्वीराज रहांगडाले(9422112264)यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष-सी.एच.पटले (7588748606),दिनदयाल पारधी(9158979725),महासचिव- देवानंद टेंभरे(8830432304)
,कोषाध्यक्ष- लोकचंद बोपचे(9860864493),अंकेक्षक- देवेंद्र बिसेन(9921663264),सदस्यात गिरधारी चव्हान(9960749161),प्रेमकुमार बोपचे(9850759878),दिलीप रहांगडाले(8624051650),प्रमोद पटले(9527678050) व शेखर रहांगडाले(9373787163) यांचा समावेश करण्यात आला.