बार्टीच्या उपक्रमात ओबीसींसाठी निधीचा अभाव

0
16

गोंदिया , दि. 20-सामाजिक न्याय मंत्रालयातंर्गत येत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी) संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण उपक्रमात ओबीसी प्रवर्गासाठी निधीचीच तरतूद नाही.निधीची तरतूद नसल्याने या प्रवर्गातील युवकांना योग्य प्रशिक्षण मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.त्यामुळे बार्टीच्या वतीने कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्यात आलेल्या ओबीसी युवकांना प्रशिक्षणचा लाभ मिळेल ही शंका निर्माण झाली आहे.एकीकडे अनु.जाती व जमातीसाठी सरकार मोठ्याप्रमाणात निधी देत असतानाच मागास असलेल्या ओबीसी प्र‹वर्गासाठी मात्र निधी नसल्याने प्रशिक्षणात ओबीसी युवकासाठी सध्या तरी काहीच करता येत नसल्याचे बार्टीचे महासंचालक डी.आर.परिहार यांनी सांगितले.त्यामुळे सामाजिक न्याय विभागात ओबीसी समाजाचे अस्तित्व काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे.बाटीर्च्यावतीने आजपयर्ंत एकही प्रशिक्षण कायक्रम किवा ओबीसी विद्याथ्यार्ंसाठी युपाएसी एमपीएसी स्पधार् परिक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आलेले नाही.ओबीसी विद्याथ्यार्ना फेलोशिपची योजना राबविण्यात येत नाही मग सामाजिक न्याय विभागाचा अन्यायच नव्हे का आता तर राज्य व केंद्रात भाजपचे सरकार आहे भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची मागणी याकरीताच केली होती कारण ओबीसीवर अन्याय सातत्याने होत अल्याचे त्यांना दिसून आले होते आता केंद्रॅातील व राज्यातील सरकार मुंडे यांचे स्वप्न ओबीसी मंत्रालया स्वतंत्र तयार करुन करेल काय अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सामाजिक न्याय विभागाकडून ओबीसी समाजाला न्याय मिळेल कसे कारण बाटीर् फक्त अनु.जाती व जमातीकरीता योजना राबवित असल्याने व त्यांच्यकारीताच निधी सरकार ठेवत असल्याने ओबीसींचे काय असा प्रश्न या मेळाव्या्या माध्यमातून समोर आला आहे.

ओबीसींच्या प्रशिक्षाथ्र्यांसाठीही निधीची तरतूद करू-ना.बडोले
बार्टी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणात ओबीसी समाज मागास असूनही त्यांच्यासाठी तरतूद नसल्याने एससी,एसटीच्या विद्याथ्र्यांसारखे ओबीसी विद्याथ्र्यांला युपीएसी व एमपीएसीच्या प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची बाब राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या लक्षात आणून देण्यात आली.तेव्हा ना.बडोले यांनी ओबीसी विद्याथ्र्यांसाठीही आपल्याला निधीची तरतूद कशी करता येईल याचे नियोजन करून प्रस्ताव सादर करण्यासंबधी निर्देश बार्टीच्या महासंचालकांना दिले.सोबतच नागपूरात देशातील पहिली कौशल्य विकास अकादमी स्तापन करण्याचा मानस आहे.दहा एकर जागेसंदभाईत नागपूर जिल्हाधिकारी यांचयाशी चर्चा सुध्दा झाल्याचे सांगितले.