सडक अर्जुनी,दि.-6 :हवामानाच्या अंदाजकीय माहिती प्रमाणे काही काही ठिकाणी गारांचा मस्त बेधूंद पाऊस पडला हाच पाऊस डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा याठिकाणी जणु गारांचा कश्मिरच फूलला असे वातावरण निर्माण झाले.
अचानक पडलेल्या या गारांचा सदर शाळेतील वर्ग ६ वी ते १० वीच्या सर्व मुलींनी मस्त बेधूंद गार वेचल्या आणि खाल्ला तसेच जमा ही केल्या, असा आनंद गगणात मावेना असाच झाला, संपूर्ण शालेय परिसरात जिकडे तिकडे फक्त गारचगार दिसल्या,इंद्रधनुष्याचे महत्व दिसता क्षणीच मुलींना सांगितले.त्या क्षणाला फक्त कश्मिर प्रांतांचीच आठवण स्मरणात राहिली असा फूलला कश्मिर निवासी शाळेत, तेव्हा विद्यार्थीनीसह मुख्याध्यापिका संध्या दहिवले, आर एच धनविजय, के डी अंबूले, एम आर नंदागवळी, पी एच ढवळे एम ओ श्यामकुवर, आवेश राऊत आदी उपस्थित राहणार होते