
गोंदिया,दि.7 -जिल्ह्यात शेतीच्या क्षेत्रात क्रांती करुन जैविक शेतीसह यौगिक शेतीला प्राधान्य देत परिसरातील शेतकèयानाही यौगिक शेती व जैविक शेतीवर भर देण्यासाठी प्रोत्साहित करणार्या रुची एग्रोच्या रायपूर येथील यौगिक व जैविक शेती फार्मवर माऊंट आबू येथील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या कृषी व ग्रामविकास प्रभागाच्या राष्ट्रीय पातळीवरील १९० सदस्यांच्या चमूने भेट दिली.यावेळी जैविक व यौगिक शेती या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे तसेच शेतकरी प्रशिक्षण केंद्र व इंटिग्रेटेड पँqकग हाऊस व शितगृहाचे उदघाटन ब्रम्हकुमारी कृषी व ग्रामविकास विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष राजयोगीनी सरलादिदी यांच्या हस्ते करण्यात आले.सुरवातीला ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ब्रम्हकुमारी कृषी व ग्रामविकास विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष राजुभाई,मध्यप्रदेश सरकारचे कृषी सहसंचालक गौर,नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रqवद्र भोसले,जबलपूर विभागाचे कृषी सहसंचालक कुमारqसग नेताम,उत्तरप्रदेश सरकारचे अतिरिक्त कृषी निदेशक बद्रीविशाल तिवारी,नाबार्डचे मुबंई विभाग उपमहाप्रबंधक राजेश दवे,महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ.राम खर्चे,ब्रम्हकुमारी केंद्राच्या विदर्भ प्रमुख रजनीदिदी,अकोला विभागाच्या रुक्मिणीदिदी,तालुका कृषी अधिकारी डी.एल.तुमडाम,तोडसाम,रुची एग्रोचे मार्गदर्शक श्रीराम ठाकूर,भालचंद्र ठाकूर,महेंद्र ठाकूर,पुनम ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
देशातील विविध कानाकोपèयातून आलेल्या ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या कृषी व ग्रामविकास विभागाच्या सदस्यांनी रायपूर येथील जैविक व योगित शेतीचे निरिक्षक केले.शेतीमध्ये अत्याधुनिक साहित्यांचा वापर करुन उत्पादन कसे घेतले जाते त्याची पाहणी केली.सोबतच विदर्भातील पहिल्या डड्ढगनफूड शेतीची पाहणी केली.
यावेळी कृषी व ग्रामविकास विभागाच्या अध्यक्ष सरलादिदी यांनी जैविक शेती ज्याप्रमाणात काळाची गरज आहे,त्याचप्रमाणात यौगिक शेतीही काळाची गरज होऊ घातली असून ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आपण आपल्या ज्ञानाचा लाभ इतरांनाही मिळावे यासाठी ८८ देशात ज्ञान देण्यासोबतच घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.श्रेष्ठ भावना मनात ठेवून केलेल्या कार्यासोबत नेहमीच यश पदरात पडते.त्यासाठी आपल्या मनात दृढसंकल्प करणे आवश्यक असून ठाकूर बंधुनी केलेल्या या सात्विक शेतीची ओळख आज देशविदेशात झालेली आहे.सात्विक अन्नातून शरिराला बळकटीच नव्हे तर आरोग्यही चांगले राहते हे जैविक व यौगिक शेतीतून समोर आणल्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसून येत असल्याचे विचार व्यक्त केले.
वेगवेगळ्या ठिकाणी येत असलेले चांगले अनुभव आणि ठाकूर बंधुनी केलेले जैविक व यौगिक शेतीच्या क्षेत्रातील योगदान हे महत्वाचे असून सर्वांनी या शेतीकडे वळावे असा सल्ला दिला.
यावेळी रुची एग्रो फार्मचे संचालक महेंद्र ठाकूर व भालचंद्र ठाकूर यांनी सविस्तर अशी माहिती त्यांना दिली.यौगिक शेतीच्या लाभाबद्दल माहिती देतांना सांगितले की फळ व भाजीपाल्यांच्या झाडांच्या शेजारी ध्यानसाधना(मेडिटेशन)केल्यास व झांडाशी संवाद साधल्यास जैविक खत मिळालेल्या फळभाजिपाल्यांच्या झाडापेंक्षा ज्या झाडांच्या शेजारी ध्यानसाधना केली जाते त्या झाडांमध्ये मोठ्याप्रमाणात बदल बघावयास मिळतो.सोबतच उत्पादनासोबतच चवीतही अधिक लाभ मिळत असल्याचे प्रत्यक्षात अनुभवास आल्याची माहिती दिली.या कार्यक्रमाला विनोद हरिणखेडे,खुमेंद्र मेंढे,प्रिया हरिणखेडे यांच्यासह गोंदियातील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयातील सर्व सदस्यांनी उपस्थिती लावली होती.




