जि.प.सावळज नं.१ चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

0
8

सावळज/प्रतिनिधी-सावळज ता.तासगाव येथील जिल्हा परिषद शाळा नं.१ सावळज शाळेचे सात विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधेचा अभाव असताना जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थी अव्वल येण्याची परंपरा जपली आहे,याबद्दल समस्त सावळज ग्रामस्थ व पालकांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सावळज जिल्हा परिषद शाळा नं.१ चे विद्यार्थी प्रियांशु गोपीचंद देशमुख हा २७४ गुण मिळवुन जिल्ह्यात ३ रा,इशांत वैभव पोळ हा २६४ गुण मिळवुन जिल्ह्यात ४३ वा,श्रवण विनोद कोळी हा २५८ गुण मिळवुन जिल्ह्यात ८४ वा,सुशांत संभाजी जाधव हा २५६ गुण मिळवुन जिल्ह्यात ९८ वा,हर्षद मारुती माळी हा २५४ गुण मिळवत जिल्ह्यात १११ वा,प्रसन्न राजेंद्र पाटील हा २५४ गुण मिळवत जिल्ह्यात ११३ वा,पृथ्वीराज गजानन पाटील हा २५४ गुण मिळवत जिल्ह्यात ११४ वा गुणवत्ता यादीत आले.

यांना मार्गदर्शन शिक्षक सुधाकर संग्रामे  यांनी केले.मुख्याध्यापक पांडुरंग शिंदे यांचे लाभले.या गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन सरपंच सौ.स्वाती पोळ उपसरपंच रमेश कांबळे,सर्व सदस्य ग्रामपंचायत, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक व समस्त ग्रामस्थ, सावळज यांनी केले. तसेच या यशाबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे गीता शेंडगे, भीमराव पवार यांनी अभिनंदन केलेले आहे.