34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
35

blank

मौदा,दि.08ः-  बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी सहित सर्वच जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना  मौदा तहसीलदार यांच्यामार्फेत पाठवण्यात आले.
महाराष्ट्रातील ओबीसींची जातवार जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा,हि मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.शिष्टमंडळाचे नेतृत्व जगदिश वाडिभस्मे यांनी केले. ईश्वर डहाके, सचिन तिघरे,मुनेश्वर डहाके,शुभम गजभिये, दिलीप कांबळे,दर्शन डहाके,निखील खुरशंकर, राजेंद्र भोसकर, धर्मदास वासनिक,नरेश डहाके, हेमंत हत्तीमारे, लोकेश हाके,प्रणय पुनवटकर, आकाश तिघरे,विनोद डहाके, केशव नागपुरे आदीं निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

blank