बळिराजा गौरव दिनानिमित्त रांगोळी व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन

0
82

कोल्हापूर (प्रतिनिधी): सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीने कृषीसम्राट, सिंधुसंस्कृतीचा राजा विश्वसम्राट बळिराजा गौरव दिनानिमित्त ( बलिप्रतिपदा) भव्य राज्यस्तरीय रांगोळी व आकाश कंदील आॅनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक(एकुण दोन)प्रत्येकी ₹ १५००/-,
द्वितीय (एकुण तीन)प्रत्येकी ₹१०००/-
तृतीय ( एकुण तीन) प्रत्येकी ₹७५०/-
उत्तेजनार्थ (एकुण दोन)प्रत्येकी ₹५००/-
आकाश कंदील स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक (एकुण तीन) प्रत्येकी ₹ २०००/-
द्वितीय (एकुण तीन) प्रत्येकी ₹१०००/-
तृतीय (एकुण दोन) प्रत्येकी ₹ ७५०/-
उत्तेजनार्थ ( एकुण दोन) प्रत्येकी ₹ ५००/-
“ईडा पिडा टळो बळिचे राज्य येवो”, ही म्हण बहुजन समाजातील भावाबहीणींच्या मनात आजही वसलेली आहे. बळिराजा गौरव दिनानिमित्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून तसेच सत्यशोधक समतावादी विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे प्रत्येक कलाकृतीच्या माध्यमातून सत्यशोधक विचार, तसेच बळिराजाचा जयघोष होणे अपेक्षित आहे.
स्पर्धेसाठी संपर्क: सुनीलकुमार सरनाईक,द्वारा, करवीर काशी कार्यालय, शिवाजी पेठ, कोल्हापूर ४१६०१२
मो.९४२०३५१३५२
ई-मेल:karveerkashi@yahoo.co.in