
मुंबई ,मराठा आरक्षणासाठी गेल्या तीन दिवसांपासूनसू आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती Sambhaji Raje उपोषणाला बसले आहेत.संभाजीराजे यांची प्रकृती आज तिसऱ्या दिवशी बिघडली आहे. त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे, पण त्यांनी औषधे घ्यायला नकार दिला आहे. डॉक्टर संभाजीराजे Sambhaji Raje यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर म्हणाले की, 60 तासांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. त्यांचे शुगर आणि रक्तदाब कमी झाला आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना
इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. पण ते उपोषणावर असल्यामुळे त्यांनी यासंदर्भात नकार दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा रक्तदाब आणि शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सोबतच संभाजीराजेंना कालपासूनसू तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे. संभाजी राजेंकडून कोणत्या ही प्रकारचे औषधे घेण्यास नकार देण्यात आला आहे. डॉक्टरांकडून कालच सलाइन लावण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण संभाजीराजेंकडून सलाइन लावून घेण्यास नकार देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीराजेंची शुगर लेव्हल व रक्तदाब कमी… डॉक्टरांचा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला…! pic.twitter.com/zwMTCqW2fm
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 28, 2022
मावळ वारकरी संप्रदायाच्या वतीने राजांच्या आमरण उपोषणाला पाठींबा pic.twitter.com/O9XdHO7qOO
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 28, 2022
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती श्री. संभाजीराजे भोसले यांनी मुंबईत आझाद मैदानावर कालपासून उपोषण सुरू केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज त्यांची आझाद मैदान येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व संभाजीराजेंना उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. pic.twitter.com/lklivctHwE
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) February 27, 2022





