रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर आल्याचा आनंद गारगोटी संग्रहालयाने द्विगुणित केला : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
9

नाशिकदि. 10: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. रोजच्या जीवनात माणसाला थोडा विरंगुळाही गरजेचा असतो. आज गारगोटी संग्रहालयाला दिलेल्या भेटीतून धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडल्याचा आनंद गारगोटी संग्रहालयाच्या भेटीने द्विगुणित केला, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ तांबे, विजय सोनवणे, गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक के. सी. पांडे, आदी उपस्थित होते.

या संग्रहालयाची सुंदरता बघून आज सांस्कृतिक उत्थानावर खऱ्या अर्थाने चर्चा करण्याची गरज असल्याची भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. आज त्यांनी सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयाच्या दोन्ही दालनातील गारगोटीतून साकारलेल्या वृक्षांच्या प्रतिकृती, देवदेवता व महात्म्यांचे गारगोटी शिल्प, फुलदाणी यांची पाहणी केली. यानंतर गारगोटी संग्रहालयातील वरील दालनातील विक्री कक्षाससुद्धा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट दिली. या दालनात गारगोटीपासून बनविलेले  दागिने, शिल्प, शोभेच्या वस्तू व ब्रेसलेट, स्फटिकांपासून बनविलेल्या माळा विक्रीस ठेवलेल्या आहेत.