भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर

0
9

मुंबई, दि. 13 : भारतीय राज्यघटनेने जनतेला मुलभूत अधिकार दिले आहेत. राज्यघटनेवर आधारित भारतीय लोकशाहीस जगभर अनन्यसाधारण महत्व आहे. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य राज्यातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या छायाचित्रांचा माहितीपट तयार करावा,जेणेकरून नवतरूणांना प्रेरणा मिळेल, असे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुराभिलेख संचालनालयामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यमंत्री श्री.यड्रावकर यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधीत करून जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजीतकुमार उगलेमंत्रालयीन मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांच्यासह कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणालेमहात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने समता आठवडा साजरा करण्यात येतो. या समता आठवड्यानिमित्त आणि आझादी का अमृत महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शन हे सर्वांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. जगभर भारतीय लोकशाहीला अनन्यसाधारण महत्व असल्याचेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

या प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरूशैक्षणिक जाणिवासामाजिक चळवळमन्वंतर पत्रकारितेचेनिवडणूकनामास्वतंत्र मजूर पक्ष जाहिरनामामतदान पत्रिकामजूर मंत्री तसेच कायदा मंत्री असताना विविध कामगार आणि नागरिकांना दिलेली भेटकायदामंत्री म्हणून घेतलेली शपथसंविधानाचा मसुदासंसदेत भाषण करतानाचे छायाचित्रत्यांची स्वाक्षरी१९१६ ते १९४९ दरम्यान सायमन कमिशन प्रतिनिधींची भेटलंडन विद्यापीठातील प्राध्यापक सहकारीराष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्यासमवेतची भेटत्यांचे विचारधनहस्ताक्षरपत्रेनिवडक ग्रंथसंपदाबौद्ध धम्माची दिक्षा देतानाचा सोहळा अशा अनेक ऐतिहासिक घटनांच्या छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे.