अनाधिकृत झोपडपट्टी हटविण्याची विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांची मागणी

0
18

नवी मुंबई,दि.21ः- नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 10 येथे असलेल्या गावदेवी मंदिराच्या समोर झालेली अनाधिकृत झोपडपट्टी हटविण्यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे सहसचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर 10 येथे असलेल्या गावदेवी मंदिराच्या समोर झालेली अनाधिकृत झोपडपट्टी हटविण्यासाठी नवी जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे सह सचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी प्रशासनासह सर्व संंबंधितांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका,उपआयुक्त ( अतिक्रमण विभाग) न‌.मु.म.पा.,विभाग अधिकारी ब’ प्रभाग नेरूळ नवी मुंबई यांना अनेकवेळा निवेदने दिली.
तसेच अतिक्रमणामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 चे अस्तित्वच धोक्यात येत आहे. त्यामुळे नेरूळ सेक्टर 10 येथिल गावदेवी मंदिराच्या समोर असलेले अनाधिकृत झोपडपट्टी वर कार्यवाही करावी अशी मागणी नवी निवेदनाव्दारे केली. मात्र त्यांच्या निवेदनावर अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. विभाग अधिकारी ब’ प्रभाग नेरूळ नवी मुंबई तातडीने दखल घेऊन नेरुळ सेक्टर 10 येथील गावदेवी मंदिराच्या समोर यांच्या आतिक्रमण बाबत कार्यवाहीसाठी नेरूळ वार्ड चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 11 एप्रिल व 19 एप्रिल 2022 रोजी पत्र दिले होते. मात्र विभागीय उपाआयुक्तांच्या या पत्रावर नवी मुंबई प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप नवी जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे सह सचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी केला आहे.