पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न

0
18

सातारा दि. 25:  टंचाई सदृष्य गावांसाठी मे महिन्यासाठी व जूनच्या काही दिवसांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

सातारा जिल्हा पाणी  टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार महादेव जानकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा आहे. टंचाई काळात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यास कोणतीही अडचण भासणार नाही. टंचाईच्या काळात योग्य नियोजन करुन पिण्याच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा परिषदेने ज्या गावांमध्ये विंधन विहिरी खराब झाल्या आहेत त्या दुरुस्तीची मोहिम हाती घ्यावी, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

टंचाईच्या काळात विद्युत वितरण कंपनी व जलसंधारण विभागाने समन्वयाने काम कारावे. शेतीला पाणी सोडले तर ते जमिनीत मुरुन विहिरींनाही त्याचा लाभ होत आहे असे खासदार श्री. पाटील यांनी सांगितले.

या बैठकीला सर्व प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.