राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३५ उदयोन्मुख तारे सन्मानित

0
14

मुंबई, दि. 4 :- देशामुळे आपण प्रगती करतो तसेच आपल्या योगदानामुळे देश प्रगती करतो. आपण करीत असलेले कार्य देशासाठी करीत आहोत आणि आपण करीत असलेली सेवा ही ईश्वराने दिलेली संधी आहे असे मानून कार्य केले तर त्या कामातून आनंदही  मिळतो व काम अधिक चांगले होते असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३५ उदयोन्मुख व्यक्तींना मंगळवारी (दि. ३) राजभवन येथे ‘कमला रायझिंग स्टार्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्टतर्फे हे पुरस्कार देण्यात आले.

अभिनेत्री प्राजक्ता माळी, नृत्य दिग्दर्शक धर्मेश येलांडे, अभिनेते प्रतीक गांधी, युवा गायक अमित त्रिवेदी, पत्रकार फेय डिसूझा,फॅशन डिझायनर दिव्या शेठ आदींना ‘कमला रायझिंग स्टार्स’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत युवक युवतींना सन्मानित केल्याबद्दल राज्यपालांनी गोवानी ट्रस्टचे अभिनंदन केले व सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. ट्रस्टचे संस्थापक रमेश गोवानी व निदर्शना गोवानी यावेळी उपस्थित होते.

प्रसिद्ध डॉक्टर प्रतित समदानी, गायिका अनन्या बिर्ला, शेफ रणवीर ब्रार, कलाकार डीजे शान, अभिनेते राहुल शेट्टी, मानव मंगलानी, विशाल अग्रवाल, रोनक, नदी संरक्षण कार्यकर्ते ग्यात्सो लेपचा, मुक्ती मोहन, रिद बर्मन, निधी भाटिया, डॉ. जितेंद्र पंड्या, अभिनेते आकाश ठोसर, वंदना जगवानी, टी. कोशी, दीक्षांत मेहरा, शौर्य मेहता, अनुजा झवेरी, करण कुंद्रा, मानसी बागला, डॉ. मीनाक्षी मंदा, एकता संधीर, लक्ष्मी गोवेकर, सौरभ चॅटर्जी, रुग्वेद बारगुजे, पृथ्वीराज पाटील, अपेक्षा दीक्षित, विनायक प्रभू यांना देखील कमला रायझिंग स्टार पुरस्कार देण्यात आले.

0000

Maharashtra Governor presents Kamala Rising Stars Awards to 35 Young Achievers

Mumbai, 4 : – Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Kamala Rising Stars Awards to young achievers from various fields at Raj Bhavan Mumbai on Tuesday (3 May).

The Awards instituted by the Ankibai Ghamandiram Gowani Trust were presented to actress Prajakta Mali, Choreographer and Dancer Dharmesh Yelande, actor Prateek Gandhi, singer Amit Trivedi, journalist Faye Dsouza and others.

Founders of the Gowani Trust Ramesh Gowani and Nidarshana Gowani were present.

Dr. Pratit Samdani, Ananya Birla, Anjali Bansal, Chef Ranveer Brar, T. Koshy, DJ Shaan, Karan Kundra, Mansi Bagla, Dr. Meenakshi Manda, Ekta Sandhir, Rahul Shetty, Manav Manglani, Vishal Agrawal, Ronak, Gyathso Lepcha, Rid Burman, Mukti Mohan, Nidhi Bhatia, Dr. Jitendra Pandya, Aakash Thosar, Vandana Jagwani, Dikshant Mehra, Shaurya Mehta, Anuja Zaveri, Lakshmi Govekar, Saurabh Chatterjee, Rugved Barguje, Prithviraj Patil, Apeksha Dixit, and Vinayak Prabhu were also presented the Kamala Rising Stars Award.