जागतिक पर्यावरण दिनी नेरुळ मध्ये वृक्षारोपण

0
10

नेरुळ(मुंबई)- प्रियांका प्लांट हाऊसच्या सौजन्याने आणि लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या वतीने नेरुळ येथील मानक हॉस्पिटल च्या मागिल मोकल्या परिसरात जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण सजरा करण्यात आला.
आतापर्यंत लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या वतीने 300 हुन अधिक झाड लावून त्यांचे संवर्धन करत असल्याची माहिती लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सदस्यांनी दिली.
पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आणि हवेतील प्राणवायुचे अर्थात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी या पावसाळी कालावधीत प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी असे आवाहन लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी केले.
वृक्षारोपण केलेल्या सर्व झाडांच्या संवर्धनाची आणि संगोपनाची जबाबदारी प्रियांका प्लांट हाऊस व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सर्व सदस्यांनी घेतली आहे.आज प्रियांका प्लांट हाऊस व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या वतीने कडू लिंब, चिकू,जांभ,पेरू,पिपंर, नारळ सुपारी, बांबू,अशी 100 झाडे लावण्यात आली.
वृक्षारोपण प्रसंगी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे, प्रियांका प्लांट हाऊसचे मालक विक्की वांडे,डॉ. निलम हिरम, निशांत सावंत, ताहा शेख, यश हांडे, दिव्याशु सिंग, आनर्थीनी लोलेस, खुशबू घोडेश्वर, राजेश भोईर उपस्थित होते.