५0 पोलीस अधिकार्‍यांचा सन्मान

0
10

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ८४१ पोलीस कर्मचार्‍यांचा त्यांचे शौर्य आणि प्रशंसनीय कामाबद्दल पोलीस पदक बहाल करून गौरव केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील ५0 पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती पोलीस पदकासाठी (पीपीएमजी) ३, पोलीस पदकासाठी (पीएमजी) १२१, उत्कृष्ट सेवेबद्दलच्या राष्ट्रपती पोलीस पदकासाठी ८९ आणि विशेष सेवेबद्दलच्या पोलीस पदकासाठी ६२८ पोलिसांनी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार विजेत्यामध्ये मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, नागपूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक रवींद्र कदम, विक्रीकर विभागातील मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, मुंबईतील पश्‍चिम विभागाचे अप्पर आयुक्त छेरिंग दोरजे, सहायक आयुक्त शशीकांत सुर्वे, ठाण्यातील सहायक आयुक्त नागेश लोहार आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर लढणार्‍या पाच पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना ‘पोलीस शौर्य’ पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये विशेष कृती दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर हिरालाल कोरेटी, पोलीस हवालदार चंद्रय्या मदनय्या गोदारी, नाईक पोलीस शिपाई गंगाराम मदनय्या सिडाम, नाईक पोलीस शिपाई नागेश्‍वर नारायण कुमराम, पोलीस शिपाई बापू किष्टय्या सूरमवार या पाच जणांचा समावेश आहे.
सीबीआयचे संयुक्त संचालक अनुराग गर्ग आणि राजीव सिंग यांच्यासह सीबीआयच्या सहा अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि २0 अधिकार्‍यांना पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे