रक्ताच्या नात्यापेक्षा संघटनेचे नाते श्रेष्ठ- हेमंत पटले

0
11

गोंदिया- : संघटनेत काम करत असतांना कार्यकत्र्यांची जीवाभावाची मैत्री निर्माण होते. संघटना हे आपले कुटूंब असून आपण सर्व भावाप्रमाणे काम करतो. या दरम्यान जो प्रेम व जिव्हाळा निर्माण होतो, त्यामुळे कार्यकत्र्याचा मनात एकजुटीची भावना तयार होवून प्रेमळ नाते तयार होते व हे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.
ते भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि. प. सभापती छायाताई दसरे,  अशोक इंगळे, नेतराम कटरे, संतोष चव्हाण, दीपक कदम, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, नंदकुमार बिसेन, भाउराव उके, श्यामलाल ठाकरे, महेश आहुजा, किशोर हालानी, दिपक पटेल, अहमद मनियार, प्रदीपqसह ठाकूर, संजय मुरकुटे, अमित झा, बाबा बिसेन, सुनिल केलनका, महेंद्र बघेले, जि. प. सदस्य शैलजा सोनवाने, श्यामकला पाचे, कमलेश्वरी लिल्हारे, पं. स. सदस्य रामराज खरे, ममता वाळवे, नगरसेवक राहुल यादव, पंकज सोनवाने, धनंजय रिनाईत, ऋषीकांत साहू, कुणाल बिसेन, चेतन बहेकार आदी उपस्थित होते
पुढे बोलतांना पटले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद व अंत्योदयाचा आधारावर असून संघटनेला बळकट व बलशाली करण्याकरीता आपल्याला अधिक जोमाने कार्य करायचे आहे.
कार्यक्रमाचे संचालन महेंद्र बघेले यांनी तर आभार अमित झा यांनी मानले. कार्यक्रमाला मुनेश रहांगडाले, मिनू बडगुजर, शंभुशरणqसह ठाकूर, मनोहरलाल आसवानी, सुधीर कोसरकर, गुड्डू कारडा, योगेश साहू, जगदिश मिश्रा, लखन हरिणखेडे, मिताराम हरडे, पन्नालाल मचाडे, पप्पू अटरे, अमृत इंगळे, मुन्ना अवस्थी, विनोद किराळ, अजित मेश्राम, शुभान रहांगडाले, फिरोज बन्सोडे, अशोक जयqसघानी, मदन पटले, अजय लौंगानी, टिटूलाल लिल्हारे, आत्माराम दसरे, डॉ. रमेश गौतम, कमलेश सोनवाने, ज्ञानचंद जमईवार, टोलीराम बिसेन, राजेश उरकुडे, अंकेश येळे, चंद्रिकापुरे, सुजित येवले, शैलेश ढाले, मंगलेश गिरी, दिलीप डोंगरे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.