देवरी येथे पशूरोग निदान शिबीर येत्या गुरूवारी

0
8

देवरी (ता.1)- कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत मोफत पशूरोग निदान औषधोपचार शिबारीचे आयोजन येत्या गुरुवारी तालुक्यातील पिंडकेपार  येथे करण्यात करण्यात आले आहे.

येत्या गुरुवारी (ता 4) रोजी तालुक्यातील पिंडकेपार येथील समाज मंदिर पटांगणावर एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत मोफत पशुरोग निदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याशिबिराचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांचे हस्ते होणार असून पिंडकेपार च्या सरपंच ज्योती धामगाये ह्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती देवकी मरई,जि.प. सदस्य उषा शहारे, पं.स. सदस्य लखमी सलामे, उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे  आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या शिबीराचा लाभ तालुक्यातील शेतकरी व पशूपालकांनी जास्तीत जास्त संख्येने घेण्याचे आवाहन देवरीचे तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे.