शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या

0
8

  •         राज्य मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांच्या उपस्थितीत नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन
  •         अनेक गणमान्य लावणार हजेरी

देवरी (ता.20)- कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेद्वारा संचालित शिवाजी शिक्षण संकुल परिसरात शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्याचे आयोजन उद्या रविवारी (ता.21) रोजी करण्यात आले आहे. या नेत्रदीपक सोहळ्याला राज्यमंत्रिमंडळातील आठ सदस्य उपस्थित राहणार आहेत. देवरीच्या इतिहासात हा पहिला प्रसंग असल्याचे जाणकारांचे मत आहे.

कृष्ण सहयोगी शिक्षण संस्थेच्या वतीने शिवाजी शिक्षण संकुलात शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण उद्या होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले हे राहतील. उद्घाटक म्हणून राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द शिवकथाकार प.पू. सदगुरुदास महाराज, शालेय शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई, आदिवासी विकासमंत्री ना. विष्णू सावरा, स्वागताध्यक्ष म्हणून आमदार संजय पुराम, हे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून खा. नाना पटोले, खा. अशोक नेते, खा. रामदास तडस, आम. ना गो गाणार,आ. अनिल सोले, आ. विजय रहांगडाले, आ. राजेश काशिवार,  आ. चरण वाघमारे, आ. रामचंद्र अवसरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आमदार रमेश कुथे, देवरीच्या सभापती देवकी मरई, नगराध्यक्ष सुमन बिसेन आदी मान्यवर उपस्थित राहतील.

शिवाजी संकुलात स्थापन करण्यात येणा-या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तालुक्यातील डोंगरगाव येथील सुप्रसिद्ध मुर्तिकार मेघशाम डोये यांनी साकारले असून सौंदर्यीकरणाची जबाबदारी ही स्थानिक कलावंत नूतन पाठक आणि सलीम खान यांनी पार पाडली.

या सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव श्री झामसिंग येरणे, सहसचिव अनिल येरणे, प्रा. जयश्री भुरे, प्रा. उपदेश लाडे आणि प्रा. मनोज भुरे, प्रा. मनीष लेंडे यानी केले आहे.