साईटोल्यात धानरोवणी यंत्राचा पहिल्यांदाच प्रयोग

0
6

गोंदिया,दि.20-पारपारिंक शेतीला सोडून शेतकèयांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करून अधिकाधिक उत्पादन कमी खर्चात मिळवून घ्यावे या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथे धानरोवणी करणाèया यत्रांच्या माध्यमातून रोवणी कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.यावेळी साईटोला येथील भोलाराम पुसाम व रवींद्र बिसेन या शेतकèयांच्या शेतात मqहद्रा कंपनीने तयार केलेल्या रोपणी यंत्राच्या माध्यमातून कशापध्दतीने धान रोपटयाची रोवणी केली जाते,हे प्रात्यक्षिक कंपनीच्यावतीने करून दाखविण्यात आले.गोरेगाव-तिरोडा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले व गोरेगाव पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी,उपसभापती सुरेंद्र बिसेन यांनी सदर यंत्र शेतात चालवून रोपणी कशी होते हे बघितले.यावेळी कृषी विभागाच्यावतीने तसेच मqहद्रा कपंनीच्यावतीने एका छोट्याशा शेतशिवार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उदघाटनप्रसंगी आमदार विजय रहागंडाले यांनी धानाची शेती ही तशी तोट्याची शेती आहे,परंतु आपल्याकडे सध्या पर्यायी पिकपध्दत घेण्याइतपत शेतकरी समृद्ध झालेला नाही.त्यामुळे आधुनिक तंत्राच्या माध्यमातून कमी खर्चाची शेती करण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून हे यंत्र खरेदी करून शेती करावी असे आवाहन केले.तसेच यासाठी ७५ हजाराचे अनुदान सुध्दा शासन देत असल्याचे सांगितले.सोबतच फलोत्पादनाकडे शेतकèयांनी वळावे त्यांना बँकेत कर्ज घेतांना अडचणी जात असल्यास आपण बँक प्रमुखांना तशा सूचना देऊ असे सांगत धान रोपणी यंत्र चांगले आहे फक्त त्याच्या सर्विसमध्ये कुठली अडचणी येऊ नये याची खबरदारी संबधित कंपनी घ्यावे असे विचार व्यक्त केले.

तर अध्यक्षस्थानावरून बोलतांना सभापती दिलीप चौधरी यांनी शेतीमध्ये अधिक उत्पादन घ्यावयाचे असल्या यांत्रीकीरणाशिवाय पर्याय नसल्याचे म्हणाले.आम्ही विरोधात असताना २५०० रुपये धानाचे भाव मागायचो परंतु सत्तेत आल्यावर १६०० च्यावर देऊ शकलो याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.तालुका कृषी अधिकारी गिधमाडे यांनी शेतकèयाना विविध योजनांची माहिती देत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.तसेच धानपिक लावतांना आधीच किडीवर मात करण्यासाठी औषधी फवारण्यासंबधीचे मार्गदर्शन केले.प्रास्तविकात उपसभापती सुरेंद्र बिसेन यांनी गावखेड्यातील शेतकरी शेतीमध्ये पुढे येऊ इच्छितो फलोत्पादन लावू इच्छितो परंतु बँका त्यांना रिर्टन भरत नसल्याचे कारण पुढे करून कर्ज नाकारत असल्याने काय करावे असे सांगत आपला खर्च वाचविण्यासाठी धान रोपणी यंत्राच्या माध्यमातून रोप लावून मळणी यंत्राच्या माध्यमातून मळणी केल्यास उत्पादन खर्चात कमी येईल असे सांगितले.

यावेळी जि.प.सदस्या ललिता चौरागडे,उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाडे,तिरोड्याचे कृषी अधिकारी पोटदुखे,गोंदियाचे कृषी अधिकारी वाहाणे,सहा.गटविकास अधिकारी इंगळे,उपविभागीय अभियंता आर.आर.चौधरी,शाखा अभियंता पी.डी.रहागंडाले,छबीलाल चौधरी,उमाबाई बिसेन,जागेश्वर सूर्यवंशी,सुखलाल येरणे,देवराज बिसेन,बबलू रहागंडाले आदी गावातील मान्यवर शेतकरी उपस्थित होते.
या यंत्राच्या माध्यमातून एका दिवसात ३ एकर शेतीमध्ये धानाची रोवणी करता येणार आहे.सोबतच १२ किलो बियाणांचे पèहे तयार केल्यास बियाणाचा खर्च वाचणार आहे.