छगन भुजबळांना 31 पर्यंत कोठडी

0
8

मुंबई – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मनी लॉंडरिंगप्रकरणी 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने  दिला. भुजबळ यांच्या एमईटी मध्ये दोनशे कोटींची रोख रक्कम, धनादेश, समभाग आदी आल्याचा दावा ईडी तर्फे करण्यात आला, तर या प्रकरणातील साक्षीदारांना धमक्‍या येत असल्याचा आरोपही आम आदमी पक्षातर्फे (आप) करण्यात आला.
महाराष्ट्र सदन व सार्वजनिक बांधकाम विभागाची अन्य कंत्राटे देताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर आहे. या आरोपाखाली त्यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्यांच्या पहिल्या कोठडीच्या वेळी तीन दिवसांची कोठडी मागणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  भुजबळ यांची सात दिवसांची कोठडी मागितली. मात्र ती मागणी न्या. भावके यांनी अमान्य करून वरील आदेश दिला