भजेपारच्या विक्तुबाबा दंडारचे जिल्हाधिकार्‍यांकडून निरीक्षण

0
9

तिरोडा : विविध पुरस्कारप्राप्त असलेल्या भजेपार (वडेगाव) येथील विक्तुबाबा दंडार मंडळाची दखल महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आली. त्याचे प्रात्याक्षिक करुन निरीक्षण करण्याची व पाठपुरावा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दंडार मंडळाचे सचिव उध्वराज टेंभरे यांच्याशी संपर्क साधून नयनरम्य चोरखमारा जलाशयाची शुटींगसाठी निवड करण्यात आली.
जलाशयाच्या नयनरम्य परिसरात पुणे व अमरावतीच्या पर्यटन विभागाच्या चमूंनी तब्बल दोन तास शुटींग करुन घेतले. त्यात श्रीकृष्णाची लावणी, मांडिला गोपालकाला यमुनेतिरी, रंगारंगाच्या गौळणी, गेल्या गोकुळ सोडूनी, कान्हा चारतो गाईनौलाख, साक्षरता अभियान, पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता अशा अनेक विषयांवर लावण्या सादर करण्यात आल्या.दंडारीमध्ये कलाकार म्हणून मंडळाचे अध्यक्ष दशरथ पटले, सचिव यु.एफ. टेंभरे, धरम बोपचे, घनशाम गिरी, श्रीपत कांबळे, फेकलाल पटले, देवचंद येवतकर, अनिल पटले, सुरेन मानकर, राजकुमार कोसमे, शिवशंकर कोसमे, विजय चौधरी, राजहंस पटले, लालचंद शेंदरे, धरम गधवार, डॉ.शिशुपाल रहांगडाले, डॉ.तारेंद्र बिसेन, शामराव टेंभरे, निलू टेंभरे, शिरीन टेंभरे, चेतलाल टेंभरे, पंचम किरसान, जगदीश बोपचे, सुकराम भुरकुडे, बंडू भलावी, रमेश पटले, प्रभू कोसमे, महादेव रहांगडाले, सुकराम किरसान, किशोर शेंडे, भिवराम देवगडे, नानेश गिरी यांनी सुरेख कार्यकेले.