नॉन क्रिमी लेअर मर्यादा सहा लाख-जीआर तीन महिन्यांत

0
12
मुंबई -'राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी नॉन क्रिमी लेअरची उत्पन्न मर्यादा वर्षाला साडेचार लाख रुपयांवरून सहा लाख रुपये करण्यासंदर्भातील सरकार निर्णय (जीआर) तीन महिन्यांत
 काढला जाईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.धनंजय मुंडे,हेमंत टिकले आदींनी हा प्रश्न उपस्थित केला होता.राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवल्यानंतर
 निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
वास्तविक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सुध्दा बडोले यांनी आश्वासन दिले होते त्यास तीन महिने लोटले यावरुन सामाजिक न्याय मंत्री ओबीसी समाजाबद्दल जाणीवपुर्वक टाळाटाळीची भूमिका घेत असल्याची 
प्रतिक्रिया ओबीसी संघटनामध्ये उमटू लागली आहे.